file photo
file photo 
विदर्भ

युवकाचा तलवारीने खून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : सीताबर्डी परिसरात ऑटोरिक्षाचालकांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करणारा गणेश शेषराव तांदुळकर (28, रा. वैशालीनगर, हिंगणा रोड, एमआयडीसी) या तरुणावर तलवारीने वार करून खून केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील सीआरपीएफ गेटजवळ घडली. मोनूसिंग (30, रा. एमआयडीसी), राकेश खूर्यवंशी, विक्की दीक्षित व अनोळखी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत.
शनिवारी सायंकाळी सीताबर्डी परिसरात ऑटो स्टॅण्डवर दिनेश पांडे व विक्की दीक्षित या ऑटोरिक्षाचालकांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. गणेश हा ऑटोरिक्षाच्या रांगा लावण्यास मदत करतो. त्यामुळे तो वाद सोडवायला गेला. यावेळी गणेशच्या तोंडून विक्कीबाबत अपशब्द निघाले. त्यामुळे विक्कीला राग आला. रात्री दिनेश व विक्‍की मद्य प्राशन करून एमआयडीसी परिसरात गेले. तेथे विक्कीचे तीन मित्र होते. विक्कीने गणेशला "तू माझ्यासाठी अपशब्द का वापरले' असे म्हणून वाद घातला. वाद वाढल्यावर विक्कीने मित्रांच्या मदतीने गणेशच्या पाठ, छाती व पोटावर तलवारीने वार करून जखमी केले. गणेशने आरडाओरड केल्याने आरोपी पसार झाले. घाबरलेल्या नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी गणेशला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत मोनूसिंग, राकेश, विक्की यांना अटक केली असून, एक जण पसार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT