Mango 
विदर्भ

Video : आंबे घ्या आंबे! टाळेबंदीत तरुणांनी थाटली फळविक्रीची दुकाने

भूषण काळे

अमरावती : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सगळीकडे टाळेबंदी आहे. परिणामी अनेकांचे व्यवसाय नोकरी ठप्प आहेत. पोट भरण्यासाठी अनेकांना विविध व्यवसायांचा आसरा घ्यावा लागतो आहे.
 लॉकडाउनमुळे अनेक युवक सिजनल व्यवसायाकडे वळल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वी ठरावीक व्यक्तीच हा व्यवसाय करत होते. मात्र लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणावर युवावर्ग या व्यवसायाकडे वळला आहे.


सिजनल व्यवसायात मोसंबी, टरबूज, खरबूज, संत्रा तथा आंब्याची विक्री हे युवक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. फळांचा राजा आंबा सर्वांनाच आवडणारा आहे. हापूस आंब्याची तर गोष्टच निराळी. सध्याचा सिजन हा आंब्याचा असल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर आंबेविक्रीला पसंती दर्शविली आहे. देवगड, रत्नागिरी आदी कोकणातील हापूस आंब्याची विक्री या युवकांकडून केल्या जात आहे. लॉकडाउनमुळे काही युवक नोकरी सोडून आपल्या घरी परतले. तर काही घरूनच काम करीत आहेत. तर काही युवकांचे ऑफिस बंद असल्याने त्यांनी आपले स्वतःचे काम सोडून सिजनल व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा या नेटकऱ्यांकडून घेतला जात आहे. आपल्या मालाचे आकर्षक फोटो, दर, घरपोच विक्री आदी सेवा या युवकांकडून पुरविल्या जात आहेत.

जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री
लॉकडाउनमध्ये सध्या फळ, भाजीपाला, दूध, किराणा, औषध आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली आहेत. बाकी इतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक, हॉटेलात काम करणाऱ्या युवकांनी जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरू केली आहे. रिकामे बसल्यापेक्षा हाताला काहीतरी काम हवे, यासाठी अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे.

सविस्तर वाचा - आता बस चालकालाही झोडपले
काहींचा विरंगुळा तर काहींची गरज
लॉकडाउनमुळे बहुतांश नागरिक घरात बसून कंटाळले आहेत. अशात घरात बसून काय करायचे, यासाठी अनेकांनी विरंगुळा म्हणून तर काहींनी आपले पोट भरण्यासाठी सिजनल व्यवसायाला पसंती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT