bad video bad video
विदर्भ

महिलेने युवकाला विवस्त्र करून तयार केला व्हिडिओ; अन्...

महिलेने तिघांनाही इशारा करून पैसे घेण्याची सूचना केली व मारहाण करण्यास सुरुवात केली

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : महिलेने तीन साथीदारांच्या मदतीने युवकाला आपल्या जाळ्यात ओढत विवस्त्र केले. एवढेच नव्हे तर व्हिडिओ (youth was undressed) देखील तयार केला. यानंतर पाच लाख रुपये दिले (Demand for five lakhs) नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आम्ही पोलिस आहोत, असे सांगून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाणही केली. हा प्रकार भवानी चाैक, विजयनगरजवळील बिल्डिंगमध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन राम कुंदनानी (वय ३१, रा. बिरजू चाैक, जि. गोंदिया) हा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुचाकीने रिंगरोडकडे जात होता. यावेळी महिलेने त्याला थांबविले. तिने अंगूर बगीचा येथे देण्याची विनंती केली. यावेळी दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले.

२८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महिलेने नवीनला फोन केला. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास भेटण्यास सांगितले. त्यानुसार तो दुपारी ३.५५ वाजताच्या सुमारास बी. एम. डब्ल्यू. बालाघाट रोड येथे पोहोचला. यावेळी महिलेने त्याला कटंगीकडे चल असे म्हटले. भवानी चाैक, विजयनगरकडे गेल्यानंतर बिल्डिंगमध्ये त्याला नेले.

तिथे एक महिला हजर होती. काही वेळेत पुन्हा तीन व्यक्ती आले. महिलेने तिघांनाही इशारा करून पैसे घेण्याची सूचना केली व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला विवस्त्र करून मोबाईलमध्ये व्हिडिओ (Video created) काढला. पाच लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आम्ही पोलिस आहोत, असे सांगून महिलेसह अन्य तीन जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रघुवंशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT