Vijay Doifode Sakal
व्हिडिओ | Videos

Vijay Doifode Accident: पुण्यातील खड्ड्यांमुळे मराठमोळा कुस्तीपटूची मृत्यूशी झुंज! बाईकवर जाताना झाला अपघात

Vijay Doifode Accident: मराठमोळा पैलवान विजय डोईफोडेला मदतीची गरज आहे.

Pranali Kodre

पुण्यातील अनेक रस्त्यांचीही अवस्था चांगली दिसत नाहीये. अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातही घडताना दिसत आहेत. याचाच फटका आता महाराष्ट्राचा २२ वर्षीय कुस्तीपटू विजय डोईफोडे याला बसला असून तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

त्याची बाईक खड्ड्यात आपटून दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला जोरदार मार लागला असून तो तेव्हापासून बेशुद्ध आहे. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यासाठी लाखो रुपयांची गरज आहे. मात्र, त्याच्या घरची परिस्थितीती बेताची आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

त्याच्या मित्रांकडून त्याच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या मित्राने सांगितले की डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार एका महिन्याच्या उपचारासाठी तरी ४०-४५ लाखांचा खर्च आहे. त्यामुळे खूप लोकांकडून मदतीची गरज आहे.

विजय हा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करतो. त्याने कोल्हापूरमध्ये कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्याने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक, ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकलं आहे. याशिवाय खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याने सलग तीन वर्षेही महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे. मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar may become Vice President: बिहारमध्ये मोठा ‘GAME’ होणार!, भाजपचा मुख्यमंत्री अन् नितीशकुमार थेट उपराष्ट्रपती?

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Gatari Special Kokani Style Kolambi Biryani: अशी बनवा मस्त मसालेदार 'कोकणी पद्धतीची कोळंबी बिर्याणी', लगेच नोट करा रेसिपी

Pratap Sarnaik: नागपूर-नागभीड ब्रॉड गेज मार्ग लवकरच होणार खुला, परिवहन मंत्र्यांनी 'ती' वेळच सांगितली

PMP Tourist Bus : पुणे-लोणावळा मार्गावर ‘पीएमपी’ची पर्यटन बस; प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अकराव्या मार्गावर सेवा सुरू

SCROLL FOR NEXT