मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेतली. Sakal
व्हिडिओ | Videos

Raj Thackeray Eknath Shinde Meeting: राज- CM शिंदेंच्या बैठकीत काय चर्चा झाली? Watch Video

Maharashtra Assembly Election 2024: जुलै महिन्यात राज ठाकरेंनी एका मेळाव्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती

सकाळ वृत्तसेवा

Eknath Shinde Raj Thackeray Meeting

मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा मनसेने केली असतानाच शनिवारी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे – CM शिंदे यांच्यात वर्षा येथे जवळपास तासभर चर्चा सुरू होती.

या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यासह मुंबई महापालिकेचे भूषण गगराणी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. मुंबईतील बीबीडी चाळ, पोलीस वसाहत पुनर्विकास प्रकल्प या विषयांसंदर्भात राज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान, जुलै महिन्यात राज ठाकरेंनी एका मेळाव्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. स्वबळावर २२५ पेक्षा जास्त जागा लढवणार आहोत, असं त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT