Fact check PM  Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडद रंगाच्या लोकांना आफ्रिकन म्हंटले नाही; क्लिप केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचा दावा

संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदींनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी सदस्य सॅम पित्रोदा यांच्या त्वचेच्या रंगावरून केलेल्या वर्णद्वेषी विधानावर जोरदार टीका केली

वृत्तसंस्था

Created By: the quint

Translated By: Sakal Digital Team

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्यात दावा केला जातोय की त्यांनी भारतीयांसह सर्व गडद रंगाच्या लोकांना आफ्रिकन म्हंटले आहे. या व्हिडिओमध्ये ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात बोलत असल्याचेही दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये काय म्हणत आहेत नरेंद्र मोदी?

"ज्यांची त्वचा काळी आहे ते आफ्रिकेतील आहेत. द्रौपदी मुर्मू देखील आफ्रिकन आहे कारण त्यांची त्वचा गडद (कृष्णवर्णीय) आहे, त्यामुळे त्यांचा पराभव झाला पाहिजे."

Fact Check PM

(Source: Facebook/Screenshot) 

(चुकीच्या दाव्याची संग्रहित लिंक तुम्हाला इथे आणि इथे पाहता येईल)

हे खरे आहे का?

हा व्हिडीओ क्लिप केलेला आहे (अर्धवट कापलेला आहे)

मूळ संपूर्ण व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी सदस्य सॅम पित्रोदा यांच्या दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना आफ्रिकन म्हटल्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. .

या व्हिडिओत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मुर्मू यांना पराभूत करू इच्छित होती कारण त्या गडद (कृष्णवर्णीय) त्वचेच्या असून आफ्रिकन आहेत.

खरी माहिती कशी शोधण्यात आली?

या विषयाशी संबंधित काही महत्वाचे शब्द टाकून गुगलवर सर्च केले असता भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ मिळाला. जो ८ मे रोजी अपलोड करण्यात आला होता.

संपूर्ण भाषण पाहिल्यानंतर व्हायरल व्हिडिओमधील काही भाग (क्लिप व्हिडीओ) हा त्याचाच मूळ भाग असल्याचे समजले.

४२.४९ मिनिटांनंतर, व्हायरल व्हिडिओमधील संदर्भ आणि भाषणाचा अर्थ लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणालेले ते पाहा:

  • "साथियों, मी विचार करत होतो की द्रौपदीजी ज्या प्रतिष्ठित आहेत आणि त्या आदिवासी समाजाच्या कन्या आहेत. आपण त्यांना राष्ट्रपती बनविले आहे मग काँग्रेस त्यांना पराभूत करण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे? मी विचार करत राहिलो.

  • ४३:३९ मिनिटांनी पंतप्रधान म्हणाले, "आज मला कळले की काँग्रेसला मुर्मू या आदिवासी महिलेचा पराभव का करायचा होता. अमेरिकेत शेहजाद्याचे काका राहतात, जे त्यांचे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक देखील आहेत."

  • त्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले, क्रिकेटमध्ये जर काही गोंधळ असेल तर थर्ड अंपायर जसे काम करतात तसे काम हे या थर्ड अम्पायरचा सल्ला घेतात.

  • यानंतर ४४.२२ मिनिटांनी, ते म्हणाले, "तसा हा शहजादा तिसऱ्या खेळाडूला विचारतो. शहजाद्याचे काका, जे तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक आहेत, म्हणाले होते, जिनकी चमडी का रंग काला होता है, वो आफ्रिका से होते है"

  • ४४.४९ मिनिटांनी ते म्हणाले, "म्हणजे, आपण सर्वांवर त्वचेच्या रंगाच्या आधारावर या देशातील लोकांवर खूप अत्याचार झाले.

  • सुमारे ४५. १२ मिनिटांच्या सुमारास नरेंद्र मोदी म्हणाले, "मग माझ्या लक्षात आले की, त्यांच्या मते, रंगाच्या आधारावर मुर्मू देखील आफ्रिकन आहेत आणि त्यांचा देखील पराभव केला पाहिजे." ( व्हायरल झालेल्या व्हिडिओत एवढाच हा भाग आहे.)

  • यानंतर पंतप्रधान म्हणाले की, मग मला कळले की, काँग्रेसची मानसिकता कशी काम करते आणि ती आपल्या देशाला कुठे घेऊन जाणार आहे.

  • शेवटी ते म्हणाले की त्वचेचा रंग कोणताही असो, आपण सर्वच श्रीकृष्णाचे भक्त आहोत त्यांच्या त्वचेचा रंग देखील आपल्यासारखाच होता.

सॅम पित्रोदा काय म्हणाले होते?

२ मे रोजी 'द स्टेट्समन' ला दिलेल्या मुलाखतीत, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेले पित्रोदा म्हणाले होते की,

"आपण ७० ते ७५ वर्षे खूप आनंदी आणि एकत्र वातावरणात जगलो आहोत जिथे आपसातले मतभेत कायम बाजूला ठेवले गेले. आपण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवू शकतो. जसे की पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबसारखे दिसतात, कदाचित गोरे दिसतात आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकनसारखे दिसतात या सगळ्याने काहीही फरक पडत नाही. आपण सगळे भावाबहिणीप्रमाणे आहोत."

काँग्रेस पक्षाने या पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यापासून लांब राहणेच पसंत केले आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या अधिकृत X पोस्टवर लिहिले की, पित्रोदा यांनी IOC मधील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

निष्कर्ष: नरेंद्र मोदींचा एक क्लिप केलेला व्हिडिओ शेअर केला जात आहे, असा दावा केला जात आहे की त्यांनी गडद (कृष्णवर्णीय) त्वचेच्या लोकांना आफ्रिकन म्हटले आहे.

'the quint' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT