Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Social Media
व्हायरल-सत्य

Fact Check : "तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही, तुम्ही तुमच्या भविष्याला मत देत आहात"; उद्धव ठाकरे यांचा तो व्हिडीओ २०१४ सालचा

वृत्तसंस्था

Created By: Fact Crescendo

Translated By : सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा २०२४ चा दुसरा टप्पा येऊ घातला असताना अनेक जुने व्हिडीओ भ्रम निर्माण करत व्हायरल केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः "तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात , तुम्ही तुमच्या भविष्याला मत देत आहात" असे वाक्य बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून असे सुचविण्यात येत आहे की, भाजपचे कट्टर विरोधक ठाकरे सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींना निवडून देण्यास मतदारांना सांगत आहेत.

दरम्यान हा व्हिडिओची तथ्यता तपासली जावी अशी एक विनंती एका व्यक्तीने केल्यानंतर Fact crescendo ने याबाबतची फॅक्ट चेक केली. या तपासणीत त्यांना आढळले की, हा व्हिडीओ २०१४ सालचा आहे जेव्हा उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युतीत होते. मात्र सध्या वेगळ्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे.

काय दावा करण्यात आला आहे?

या युजरने टाकलेल्या शॉर्ट व्हिडीओ क्लिपमध्ये उद्धव ठाकरे हे काँगेसवर टीका करत असून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदासाठी कसे योग्य आहे याबाबत भाष्य करत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ ओळ देत म्हंटले आहे की, " या मराठी माणसाचं सांगणं जरा मनावर घ्या आणि तुम्ही नरेंद्र मोदी भाईंना मत देत नाही आहातआपण आपल्या भवितव्याला मत देत हे लक्षात ठेवा."

तथ्य तपासणीत (Fact-check)मध्ये काय आढळले?

पुरावा १

या व्हायरल व्हिडीओमधील शब्द तपासले असता हा व्हिडीओ २१ एप्रिल २०१४ चा असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर भाजप आणि शिवसेना यांच्या एकत्रित सभेतील उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ही शॉर्ट क्लिप आहे.

हा संपूर्ण १५ मिनिटांचा व्हिडीओ यू ट्यूबवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये ११.२८ सेकंदांनी त्यांनी भाष्य केले असल्याचे दिसत आहे.

२०१४ मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची युती होती आणि त्यांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील पहिल्या टप्प्याचा प्रचार करताना ठाकरे म्हणाले, “ एक प्रश्न स्वतःला विचारा काँग्रेस पक्षाकडे पंतप्रधानपदासाठी विश्वासार्ह आणि योग्य उमेदवार आहे का? तुम्ही फक्त नरेंद्र मोदींना मत देत नसून, खरं तर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मत देत आहात."

त्यावेळी व्यासपीठावर पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना (अविभाजित) आणि भाजप यांची २५ वर्षांहून अधिक काळ युती होती. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ते वेगळे झाले. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचा गट आणि भाजपमध्ये मतभेद आहेत.

पुरावा २

या भाषणाचे वार्तांकन झी २४ तास ने देखील केले होते.

निष्कर्ष

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हायरल व्हिडिओ मूळचा २०१४ सालचा आहे, जेव्हा ठाकरे मोदींसोबत प्रचार करत होते. हा व्हिडीओ आताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल केला जात असला तरी शिवसेना आणि भाजपची युती असताना ठाकरे यांचे विधान करण्यात आले होते आणि त्यात त्यांची सध्याची भूमिका दिसून येत नाही.

'Fact Crescendo' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT