वारी

साहित्यिकांची निघाली पहिल्यांदाच देहू ते निगडी साहित्य प्रबोधन दिंडी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - 
""गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे । 
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ।।''
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील भक्तिभाव विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात ओथंबत होता. हाच भाव घेऊन साहित्यिकांनी शनिवारी संत तुकाराम महाराज पालखीसोबत पहिल्यांदाच "साहित्य प्रबोधन दिंडी' काढून वेगळ्या उपक्रमाला सुरवात केली. 

देहू ते निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकापर्यंत ही साहित्य प्रबोधन दिंडी निघाली. मुखाने सुरू असलेला "ज्ञानोबा-तुकाराम'चा गजर, वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले साहित्यिक, डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या कवयित्री असा वेगळाच थाट पाहण्यास मिळाला. साहित्य संवर्धन समिती आणि पिंपरी-चिंचवड साहित्य मंच यांनी संयुक्तपणे हा उपक्रम घेतला. साहित्यिक राजेंद्र घावटे, सुरेश कंक, अरविंद वाडकर, सुहास घुमरे, मुरलीधर दळवी, उमेश सणस, नंदकिशोर आवारी, विनिता माने-पिसाळ, सुमन दुबे आदींनी त्यामध्ये सहभाग घेतला. 

सकाळी देहू येथील इनामदारवाड्यापासून संत तुकाराम महाराज पालखी मार्गस्थ झाल्यानंतर त्यामध्ये साहित्यिक सहभागी झाले. निगडी येथे महानगरपालिकेतर्फे पालखीचे स्वागत झाले. तिथेच साहित्य प्रबोधन दिंडीचा प्रवास संपला. 

"" या उपक्रमाच्या माध्यमातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ महाराज तसेच कवी कुसुमाग्रज यांच्यापासून ते थेट कामगार कवी नारायण सुर्वे यांच्या कालखंडापर्यंतच्या विविध नामवंत साहित्यिकांनी संत साहित्याच्या दृष्टीने केलेल्या अभ्यासाचा परामर्श घेणार आहोत.'' 
- सुरेश कंक, अध्यक्ष, साहित्य संवर्धन समिती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

Viral Video : फॅन मैदानावर लाडक्या खेळाडूला भेटायला आला अन् कॅप चोरून पळाला; KKR च्या खेळाडूसोबत नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

FDA Crime : 'गोरस भंडार'वरील कारवाई मागे घेण्याच्या हालचाली, पूर्वसूचना न देता FDAने केलं सील; हायकोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT