Lina-and-Mangesh
Lina-and-Mangesh 
वुमेन्स-कॉर्नर

जोडी तुझी माझी : नाटक : आयुष्याचा प्राणवायू

लीना भागवत-मंगेश कदम

नाटक हाच आयुष्याचा प्राणवायू असलेली खऱ्या आयुष्यातील पती-पत्नीची जोडी म्हणजे अभिनेत्री लीना भागवत आणि प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मंगेश कदम. मंगेशनं लीनाला पहिल्यांदा ‘आयएनटी’च्या एकांकिका स्पर्धेत पाहिलं. तेव्हा लीनानं गोखले कॉलेजतर्फे ‘बॉम्ब ए मेरी जान’ या एकांकिकेत काम केलं होतं. लीना आणि मंगेश यांची पहिली भेट झाली ती ‘गोवा हिंदू असोसिएशन’च्या ‘हाच खेळ उद्या पुन्हा’ या नाटकाच्या वाचनाच्या वेळी. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कोणता, असं विचारल्यावर लीना म्हणते, ‘मंगेश आणि माझं लग्न आमच्या आयुष्याला वेगळं वळण देणारं ठरलं. तो दोघांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.’ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोघांच्या नाटकाच्या आवडीबद्दल मंगेश म्हणाले, ‘मी आणि लीना चार दिवस बाहेर फिरायला गेले होतो. आम्ही थोड्या वेळानं ‘नाटक’ याच विषयावर चर्चा करू लागलो, काही नाटकांच्या संहिताही आम्ही तिथं वाचल्या. आमच्या दोघांच्या आयुष्यात ‘नाटक’ या कलेला महत्त्वाचं स्थान आहे. लीनाबरोबर केमिस्ट्री उत्तम जुळत असल्यानं भूमिका कोणतीही असो, आमच्यातील ट्युनिंगचा फायदा होतोच. सोनी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आठशे खिडक्या नवशे दारे’ या मालिकेतील कलाकारांना घरच्या घरी शूटिंग करणं, हे आव्हान होतं. यावर लीना सांगते, ‘आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातही मजा आहे. या मालिकेच्या निमित्तानं मी कांदाभजी करू लागले. आपलं घर शूटिंगमध्ये दिसत असल्यानं घरातल्या एखाद्या कोपऱ्यात कचरा नाही ना, असा विचार करते. एकंदरीत या मालिकेमुळं माझा आळशीपणा थोडा कमी झाला.’ सोशल मीडिया संदर्भात लीना फारशी ॲक्टिव्ह नसते. याबाबत ती म्हणते, ‘सध्या अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होतात. अनेक दिवस लोकांना न दिसल्यास लोक आपल्याला विसरतील, अशी त्यामागची भीती असते. अशा भीतीपोटी सातत्यानं व्यक्त होणं मला पटत नाही. तुम्ही आत्तापर्यंत केलेलं चांगलं काम लोकांच्या लक्षात असतंच. नथीतले फोटो टाका, असे प्रकार मला आवडत नाहीत, पण तो शेवटी ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.’ 

लीनाच्या स्वभावातील आवडणाऱ्या आणि खटकणाऱ्या गुणांबाबत मंगेश म्हणाले, ‘लीनाला पटकन राग येतो, ही गोष्ट मला खटकते. मात्र विचार केल्यावर लक्षात येतं, की हाच तिच्या स्वभावातील चांगला गुण आहे. ती स्पष्टपणे बोलून मोकळी होते. लीनानं रेडिओ जॉकीची ऑडिशनही उत्तीर्ण केली होती, मात्र पुढं अभिनयाच्या क्षेत्रात ती व्यग्र झाली. तिनं आकाशवाणी मुंबई विभागाच्या नाट्यविभागासाठी ‘असं घडलं नाटक’ ही मालिका उमा दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. त्या निमित्तानं अनेक मान्यवरांच्या मुलाखती तिनं घेतल्या.’

नाटक, मालिका आणि चित्रपट यांतील जास्त आवडतं माध्यम कोणतं, यावर लीना म्हणते, ‘अर्थातच नाटक. नाटकात जिवंतपणा वाटतो. लोकांचा प्रतिसाद लगेच मिळतो.’
लॉकडाउनच्या काळाबद्दल मंगेश म्हणतात, ‘आपलं आयुष्य लॉकडाउनपूर्वी अत्यंत वेगवान होतं. लॉकडाउनमुळं जग शून्यावर आलं. सुरुवातीला भोवळ आल्यासारखं वाटलं. मग अनेक गोष्टी पुन्हा नव्यानं आठवल्या. मी माझी थिंकिंग प्रोसेस बदलली. मी जरा जास्त भावूक झालो या काळात.’ लॉकडाउननंतर करिअरचे काही नवीन पर्याय सापडतील का, याबद्दल लीना म्हणाली, ‘नाटकांच्या बाबतीत ‘ऑनलाइन’ हा पर्याय असू शकत नाही. प्रत्यक्ष नाटक बघण्यातील गंमत मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा संगणकावर नाही.’
(शब्दांकन - गणेश आचवल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT