Radhika-Deshpande
Radhika-Deshpande 
वुमेन्स-कॉर्नर

वुमनहूड : ए मुली...

रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

पुणे टिक्कर बिल्ला खेळताना १०, २०, ३०, ४०... अशी घरं लंगडी घालत आम्ही मैत्रिणी पार करायचो. प्रत्येक घर म्हणजे आयुष्यात येणारं वय आहे असं कुणी सांगितलं असतं, तर ती आम्ही झपाझप सर केली असती. कारण, त्या वयात सगळ्यांनाच पटापट मोठं व्हायचं असतं, नाही? आज मी एकटीच मनातल्या मनात खेळते आहे आणि चाळिशीच्या घरात येऊन थबकले आहे. मी १७ ऑगस्टला चाळीशी गाठणार आहे. ‘चाळीशी आली’, असं म्हणण्याचा हाच तो क्षण. या वयात बायकांना वय लपवावंसं वाटतं म्हणे. हा विचार मला शिवता क्षणी तो झटकून जगजाहीर करून उत्साहानं आणि आनंदानं साजरा करायचं ठरवलंय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तारुण्य पीटिका येऊ घातल्यापासून ‘आपण चिरतरुण दिसायला हवं’चा प्रवास एक स्त्री करत असते. चाळीस या आकड्याला आपण नको तितकं वजन देऊन बसलो आहोत. म्हणूनच हे वय मला पचवायला जड जातंय. लेखाद्वारे माझ्या वयातल्या मुलींशी केलेला खुला संवाद करणार आहे. 

किशोर वयात असताना मी आजी आणि आईला म्हटलं, ‘आपण तिघीही लाल रंगाच्या साड्या नेसू आज...’ त्यावर आजी म्हणाली, ‘छे! माझ्या वयात कोणी एवढ्या भडक रंगाची साडी नेसतं का?’ आई म्हणाली, ‘आपल्याकडं एकच लाल रंगाची साडी आहे. तू नेस, तुझं वय आहे. माझी चाळीशी आली.

माझ्याकडं कोण बघणार आहे आता?’ चाळीशी येणं म्हणजे काहीतरी भयंकर असतं, असं तेव्हा मला वाटलं होतं. आम्हा मुलींना वयाच्या टप्प्याटप्प्याला अनेक गोष्टी सांगण्यात येतात. मी नऊ वर्षांची असताना आर्टिस्टिक स्केटिंगमध्ये नॅशनल ब्राँझ मेडल मिळवलं होतं. त्यासाठी तयारी करत असताना शेजारच्या काकू म्हणाल्या, ‘तुझ्या वयोगटात तू सर्वांत लहान आहेस.

बक्षीस मिळवणं कठीण आहे तुला.’ १९ वर्षांची असताना म्हणाले, ‘वयात आली आहेस. आता छोटे कपडे घालायचे नाहीत.’ २९व्या वर्षी मी चंदेरी दुनियेत प्रवेश करायचं ठरवलं तेव्हा म्हणाले, ‘एका मुलीची आई आहेस. हे काय वय आहे या क्षेत्रात करिअर करायचं?’ आज मी ३९ वर्षांची आहे. मला सांगण्यात आलं, ‘या वयात कोणी कॉलेजमध्ये जात नाही.’ मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एकोणतिसाव्या वर्षी पूर्ण केलं. 

मैत्रिणींनो, चाळीशी आली आहे आणि म्हणूनच ‘आता माझं वय झालं आहे,’ असं न म्हणता मी कात टाकणार आहे. नवे पंख लावून घेणार आहे. इथून पुढं मी मेकअप करणार ते चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या लपवण्यासाठी नाही, तर चेहऱ्यावरची रूपरेषा उठावदार दिसावी म्हणून. मैत्रिणींनो, आत्ता आत्ता कुठं मी माझ्यातल्या अल्लड, उनाड, अवखळ मुलीला ओळखायला लागले आहे. वयापेक्षा काळाप्रमाणं वाढायला काय हरकत आहे?  माझ्या प्रवासाचं विहंगावलोकन करताना लक्षात आलं आहे की, माझं रसायन वेगळं आहे.

माझं मन कलाकाराचं आहे आणि बुद्धी खेळाडूची. कलाकाराला स्वतःचं वय नसतं. एका खेळाडूची वृत्ती असते आलेला प्रत्येक क्षण स्फूर्तीनं, साहस करून जिंकायचा, पूर्णत्वाला न्यायचा. शरीराचं काय? ते मन आणि बुद्धीच्या सांगण्याच्या बाहेर नाही. माझ्या ४० मैत्रिणी मला ऑनलाइन भेटणार आहेत.

माझी आई मला ओवळणार आहे आणि माझ्या सासुमा त्यांच्या हातून बनवलेल्या खास केकचा घास मला भरवणार आहेत. तेव्हा ४० वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर ४ वर्षांच्या मुलीचं हसू फुटणार आहे. माझ्यातल्या मुलीला मला काही सांगायचं आहे. ‘ए मुली… आकडेमोड करत बसशील तर वयात आलेल्या क्षणांना कधी वेचशील? चल ऊठ, नवीन अंगरखा चढव, कोरे करकरीत पंख लावून घे, तो बघ. ४० क्रमांकाचा दरवाजा. सताड उघड त्याला, उचल पावलं आणि घे भरारी...’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT