Sickness 
वुमेन्स-कॉर्नर

आईशी संवाद : कोरोनानंतरची गुंतागुंत

डॉ. अमोल अन्नदाते

कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये झाली, तरी ती एकतर लक्षणविरहित असते किंवा सर्दी-खोकलासदृश सौम्य स्वरूपाची असते. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संसर्गाविषयी घाबरण्याचे कारण नाही; पण गेल्या सहा महिन्यांत लहान मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी डिसीज (एमआयएस) ही गुंतागुंत काही आठवड्यांनी निर्माण होताना दिसते आहे. पालकांनी ती लवकर ओळखल्यास व त्वरित उपचार सुरू केल्यास ती फार गंभीर रूप धारण करणार नाही.एमआयएस ही गुंतागुंत कोरोना संसर्ग होतो तेव्हा होत नाही. कोरोना होऊन गेल्यास ३ ते ६ आठवड्यांनी मुलांमध्ये याची लक्षणे दिसून येतात.

एमआयएसचे कारण
लहान मुलांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती प्रभावीपणे कार्य करते, म्हणून त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येतात; पण प्रतिकारशक्ती बहाल करणाऱ्या अँटीबॉडी या चुकून शरीरातील काही अवयवांविरोधात कार्य करू लागतात. यामुळे मेंदू, आतडी, त्वचा, डोळे अशा अवयवांना इजा होते व या आजाराची लक्षणे दिसतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • वय : साधारण ३ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये हा आजार दिसतो आहे. 
  • लक्षणे : कोरोना होऊन गेलेल्या मुलांमध्ये किंवा घरात कोरोनाबाधित व्यक्ती असल्याचा इतिहास असल्यास एक महिन्यानंतर मुलांना ताप असल्यास जास्त वेळ न घालवता बालरोगतज्ज्ञांना दाखवावे. तसेच घरातील पूर्वइतिहास सांगावा.
  • अंगावर चट्टे, जुलाब व उलट्या, पोटात दुखणे, डोळे/ जीभ/ओठ लाल होणे, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी कमी होणे; मेंदूज्वरासारखी ताप, झटके किंवां बेशुद्ध असल्याची लक्षणे 

निदान
तापाचे निश्चित कारण सापडत नसेल किंवा ताप हा कारण सापडूनही नियमित उपचाराला प्रतिसाद देत नसेल व ७ दिवसांपेक्षा जास्त लांबत असेल तर बालरोगतज्ज्ञ एमआयएसची शक्यता पडताळून पाहतात. यासाठी रक्तामध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडी आहेत का हे तपासले जाते व त्या पॉझिटिव्ह आल्यास निदान निश्चित केले जाते. या आजाराचे बरेच रुग्ण चुकीने डेंग्यू असल्यासारखे वाटतात. कारण कोरोना व डेंग्यूच्या अँटीजेनमध्ये काही प्रमाणात साधर्म्य असल्याने या आजारात डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह येते. 

प्रतिबंध

  • या आजाराचा प्रतिबंध म्हणजे कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून वापरली जाणारी तीन मूलभूत तत्त्वे : मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे. 
  • लवकर निदान झाल्यास या आजाराचे उपचार नीट होतात व गुंतागुंत टळते. म्हणून लवकरात लवकर उपचार सुरु करणे हा प्रतिबंधाचाच भाग आहे. 
  • भारतात याचे प्रमाण कमी असले, तरी प्रत्येक शहरात याच्या केसेस आढळून येत आहेत. म्हणूनच कोरोना होऊन गेल्यावर व घरात कोरोनाबाधित व्यक्ती असल्यास मुलांच्या तब्येतीवर पुढील दोन महिने लक्ष ठेवावे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

तिकिटावरून वाद, आधी शाब्दिक चकमक, नंतर बेदम हाणामारी; चालत्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशाचा तुफान राडा, पाहा व्हिडिओ

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

SCROLL FOR NEXT