Image Sakal
वुमेन्स-कॉर्नर

‘पॉवर’ पॉइंट : इमेज टिकवण्याची धडपड कशाला?

‘आता माझी ठराविक एक इमेज झालीये. म्हणजे तशी तयार करण्यासाठी मी खूप कष्ट केलेत. आता कुणाशी, किती, केव्हा, कुठे बोलायचं याचा जरा जास्त विचार करून पावलं टाकयला लागतात...’

हर्षदा स्वकुळ

‘आता माझी ठराविक एक इमेज झालीये. म्हणजे तशी तयार करण्यासाठी मी खूप कष्ट केलेत. आता कुणाशी, किती, केव्हा, कुठे बोलायचं याचा जरा जास्त विचार करून पावलं टाकयला लागतात...’ एक व्यक्ती मला अगदी अभिमानानं सांगत होती. त्या व्यक्तीकडे मी पाहतच राहिले. इमेज तयार केलीये म्हणजे काय? ती मेंटेन ठेवायची असते म्हणजे काय? इतकी कधीपासून स्वप्रेमात मश्गूल झाली ही व्यक्ती? कशाचीच उत्तर नव्हती.

अशा शेकडो व्यक्ती आजूबाजूला दिसतील. एका ठराविक उंचीवर (म्हणजे त्यांच्या दृष्टीनं) गेल्यावर भोवतालच्या माणसांचं वर्तुळ अधिक लहान होत जाणं, हे त्यांना चुकल्यासारखं नाही, तर इमेज तयार झाल्याचं लक्षण वाटणं, हे खरंतर धोकादायक. जिच्याशी बोलत होते ती व्यक्ती आजकाल चारचौघात फिरायला जाताना, कुणाबरोबरचा फोटो पोस्ट करताना, ‘कसं दिसेल?’ याचा विचार करायला लागली होती.

आता तिचं हसणं फारसं खळाळतं नव्हतं. त्यामागे गणितं होती. आता तिचं बोलणं ओघवतं वाटेनासं झालं, त्याला नाटकीपणाची झालर चढू लागली. हळूहळू त्या व्यक्तीला, किंवा त्या व्यक्तीच्या ‘इमेज’ला इतरांनीही स्वीकारलं. अखेरीस ती व्यक्ती, छान सगळ्यांचं नीट ऐकून घेणारी, ‘सर्वसमावेशक’ वगैरे वाटू लागली. तेच तर ती व्यक्ती मला सांगत होती ना. हीच ती ‘इमेज’ तयार करण्यासाठीचे प्रयत्न वगैरे.

पण आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नसतं. कधी ना कधी ओढलेले मुखवटे फाटतात. कारण मुखवटे धारण न केलेली माणसंही याच जगात असतात. जी ‘हो ला हो’ म्हणणारी नसतात, म्हणून ती उद्धट वाटू शकतात. जी त्या त्या वेळी ठामपणे बाजू घेतात म्हणून ती सर्वसमावेशक नाहीचेत, असा गैरसमज होऊ शकतो.

एखाद्या मोक्याच्या प्रसंगात मग ही दोन माणसं समोरासमोर उभी राहतात, तेव्हा मग अशा पारदर्शी माणसांसमोर ‘इमेज’ टिकवणं फार अवघड असतं. तेच माझ्या ओळखीच्या व्यक्तीचं झालं. ती व्यक्ती आत्मविश्वासानं काही बोलायला लागली, तेव्हा त्याचं रूपांतर आगाऊपणातच झालं. कारण आत्मविश्वासानं ठामपणे बोलण्याची सवय तर इमेज टिकवण्याच्या नादात केव्हाच मोडली होती. ती व्यक्ती सर्वसमावेशक वगैरे न होता फक्त स्वतचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडायला लागली तेव्हा ती स्वार्थी वाटू लागली. जेव्हा ती व्यक्ती हो ला हो म्हणणं थांबवायला लागली तेव्हा ती आक्रमक वाटायला लागली.

सांगायचा मुद्दा, आपण जसे आहोत तसं राहिलं नाही, की एक दिवस आपल्या मुखवट्यात आपणच गुदमरू शकतो. खासकरून नोकरीच्या ठिकाणी कुणीही निःस्वार्थीपणे म्हणजे सेल्फलेस डीलसाठी आलेला नसतो. मग अशा वेळी कुठला आव आणून जगणं कशासाठी? कारण असं जगणं कधीतरी उघडं पाडू शकतं.

पहिल्यापासून पारदर्शी असलेले लोक कधी उघडे पडत नाहीत. ‘आहे हे असं आहे’ हे त्यांच्याबाबतीत पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी मान्य केलेलं असतं.

नात्यांतही तेच गणित असतं. जितकं देतो तितकंच मिळतं. त्यामुळे सगळ्यांमध्ये स्टँडआऊट व्हायचं असेल तर आधी इमेज मेंटेन करण्याचा अट्टाहास सोडलेला बरा. तुम्हाला काय वाटतं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या सुरू असलेल्या खटल्यात न्याय कधी मिळणार? उद्धव ठाकरेंनी थेट 'ती' वेळच सांगितली! म्हणाले...

India Squad for Australia : रोहित शर्मा, विराट कोहलीच्या ODI भविष्याबाबत संकेत मिळाले, पण दोन खेळाडूंचं करियर संपल्यातच जमा झाले! संघात त्यांचे नावच नाही

Nilesh Ghaiwal: 'घ'च्या ऐवजी 'ग', घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी कसा घातला घोळ? सापडला मोठा पुरावा, १0 दिवसांपूर्वी उघडले बँक खाते

Latest Marathi News Live Update : जयंत पाटलांवरील टीकेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; वादावर पडदा

Lasalgaon News : बसस्थानकात विद्यार्थिनींचा आक्रोश! 'आम्ही सुरक्षित आहोत का?'; लासलगाव बस डेपोच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT