Sauces
Sauces Sakal
वुमेन्स-कॉर्नर

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : सॉसेजेस : सर्वांत जुने इन्स्टंट फूड

मधुरा पेठे

जगभर सॉसेजेस हा आवडत्या आणि जुन्या पदार्थांपैकी एक आहे. ग्रीक महाकाव्यात याचा संदर्भ सापडतो; तसेच इजिप्शियन थडग्यातदेखील सॉसेजसदृश पदार्थ मिळाले आहेत.

सॉसेजेस म्हणजे मांसाचे विविध भाग, निरनिराळे हर्ब्ज, मसाले, फॅट, रक्त आणि प्रिझर्व्हेटिव्ह्‌ज एकत्र करून तयार केलेला पदार्थ. जुन्या पद्धतीनुसार ते प्राण्यांच्या आतड्यात भरले जायचे, तर आता सिंथेटिक केसिंग वापरले जाते.

ताजे, स्मोक किंवा वाळवलेले सॉसेजेस आवडीने खाल्ले जातात. सॉसेजेस म्हणजे तयार ‘मिट पॅटी’ असते- ज्याचा उपयोग दिवसभरात कोणत्याही जेवणात सहजपणे केला जाऊ शकतो. सॉसेजेसला सर्वांत जुने इन्स्टंट फूडही म्हणू शकतो.

युरोप, आफ्रिका, अमेरिका, चीन अशा बहुतांशी देशात निरनिराळ्या पाककृतींचे सॉसेजेस तयार होतात. वेगवेगळे मसाले, घटक वापरून विविध चवीचे सॉसेजेस जेवणाची लज्जत वाढवतात. सॉसेजेस एखाद्या कॅनव्हासप्रमाणे आहेत- जे प्रत्येक देशात तिथे उपलब्ध असणाऱ्या पदार्थानुसार तयार केले जातात. 

एकेकाळी गरिबांचे अन्न म्हणून गणला जाणारा हा पदार्थ आज मोठ्या दिमाखाने पाकसिद्धीचा नमुना म्हणून ओळखला जातो. मांसातील नको असलेला भाग टाकायला लागू नये या उद्देशातून हा पदार्थ तयार झाला असावा. तसेच उरलेले मांस दीर्घकाळ टिकवण्यासाठीदेखील जे प्रयोग केले गेले असावेत यातूनच सॉसेजेससारखे पदार्थ तयार झाले असावेत. 

बहुतांश ठिकाणी सॉसेजेस पोर्कपासून तयार होतात; परंतु कझाक किंवा काही इतर प्रांतांत घोडा, युद्धकाळात काही पक्षी, तर इंग्लडमध्ये मिक्स फिशपासूनही सॉसेजेस तयार केले जात होते. युद्धकाळात मासांच्या कमतरतेमुळे यात मांस कमी आणि फॅटसोबत ब्रेडक्रंब  वापरले जाई. हे सॉसेजेस फ्राय करताना मोठा आवाज करत फुटायचे, म्हणून त्यांना बँगर्स असे नाव पडले आणि तेच पुढे प्रचलित झाले.

मध्ययुगात लेंट उपवास काळात मांस, दुग्धजन्य पदार्थ खाण्यावर बंदी घातली जाई. प्रत्येक राजाच्या काळात ही बंधने कमी-अधिक असत.  पंधराव्या शतकात लेंट उपवासाविरुद्ध दीर्घकाळ आंदोलन झाले, त्यात कडवा विरोध दर्शवण्यासाठी बहुसंख्यानी एकत्र येऊन सॉसेजेस पार्टी केली. पुढे या आंदोलनाचा मोठा परिणाम इतिहासात दिसून येतो. या पदार्थामुळे अनेकदा विषबाधा झाल्याचे इतिहासात बघायला मिळते. सॉसेजेस तयार करताना स्वच्छतेची काळजी न घेतल्याने अनेक जण दगवल्याच्या घटना घडल्या आहेत. याच कारणाने दहाव्या शतकात बायझनटाईन काळात राजा लिओ पाचवा याने विषबाधेमुळे ब्लड सॉसेजेसवर बंदी घातली. एकोणिसाव्या शतकात इंग्लडमधील अनेक खेड्यांत जीवघेण्या विषबाधेचा उद्रेक झाला. त्यावेळेसदेखील सॉसेजेस हेच मूळ कारण होते. इतके होऊनदेखील सॉसेजेसचे वेड काही कमी झालेले दिसून येत नाही. 

२०१५ मध्ये झालेल्या वैज्ञानिक परीक्षणानुसार सॉसेजेस, बेकन, हॅम, फ्रोजन मिट दीर्घकाळ खाणे सिगरेटइतकेच आरोग्यास हानीकारक आहे आणि त्यामुळे अनेक रोग जडू शकतात किंवा आयुर्मान कमी होऊ शकते, असा अहवाल सादर केला गेला. त्यावरून लोकांना आवाहन केले गेले, की या पदार्थांचा वापर कमी करून इतर पर्यायी पदार्थांची निवड करा. परंतु लोकांनी सोशल मीडियावर याविरुद्ध सडकून टीका केली आणि काही आठवड्यांतच इंग्लडमध्ये सॉसेजेस आणि प्रोसेस्ड मिटच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसली. खवय्यांनी त्यावर म्हटले, की सॉसेजेसशिवाय दुःखी जीवन जगण्यापेक्षा सॉसेजेस खात छोटेसे आयुष्य आनंदात जगू.  एकूण काय तर, जगात कुठेही जा- खवय्ये त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जीवावरदेखील उदार होतात. आज सॉसेजेसपासून तयार केलेला एक पॉप्युलर पदार्थ पाहूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT