how to control wife anger Esakal
वुमेन्स-कॉर्नर

Control Wife Anger: पत्नीचा राग शांत करायचाय, मग या Tips तुमच्यासाठी

पत्नीचा Wife राग कसा शांत करायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पत्नीचा राग शांत करू शकता

Kirti Wadkar

How to control wife anger: अनेकदा पती पत्नीच्या नात्यात एखादा छोटासा गैरसमजही भांडणासाठी मोठं कारण ठरू शकतं. पती पत्नीच्या नात्यात समतोल राखण्यासाठी दोघांनीही कायम प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे.

कितीही रुसवे-फुगवे आले तरी ते दूर करून नात्याची विण मजबूत करणं गरजेचं असतं. अनेकदा बऱ्याच पुरुषांना आपल्या रुसलेल्या पत्नीला कसं समजवाव हे कळत नाही.

पत्नीचा राग तर दूर करायचा असतो. मात्र त्यासाठी नेमकं काय करायला हवं ज्याने तिचा राग शांत होईल हे अनेकांना कळत नाही. Marathi Tips how to calm wife anger

बऱ्याचदा अनेक पुरुषांना इच्छा असूनही पत्नीचा राग Anger दूर करण्यासाठी योग्य मार्ग निवडता येत नाही. यातून मग ताण वाढत जातो. अशाने काही वेळा नात्यामध्ये मोठी दरी निर्माण होवू शकते.

पत्नीचा Wife राग कसा शांत करायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पत्नीचा राग शांत करू शकता.

१. रुसव्या मागचं कारण आधी शोधा- जर तुमची पत्नी नाराज असले तर आधी स्वत:ला काही प्रश्न विचारा. पहिला म्हणजे तुम्ही कोणती चूक तर केलेली नाही ना आणि दुसरा प्रश्न म्हणजे तिच्या रागवण्यामागचं कारणं खरचं योग्य आहे का.

तिचा रागावण्याचं कारणं योग्य असले तर नक्कीच तिच्याशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुमची चूक असेल तरी नक्कीच तिला सॉरी बोला. तिचा राग शांत झाल्यावर मात्र तिला सारखं नाराज होणं योग्य नाही हे देखील सांगा. How to make wife happy

२. तिला थोडी स्पेस द्या- रागावलेल्याय पत्नीला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर काही वेळा तिला विचार करण्यासाठी वेळ देखील द्या. यामुळे काही वेळाने तिचा राग कमी होईल. आपण उगीचच नाराज झालो हे तिच्या लक्षात येईल.

३. मुलांची मदत घ्या- मुलं ही घराला जोडण्यासाठी , घरात आनंदाचं वातावरण निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावता. जेव्हा पत्नी तुमच्यावर रागावली असेल तेव्हा तुम्ही मुलांकडे जास्त लक्ष द्या.

मुलांसमोर कदाचित ती तुमच्याशी वादही घालणार नाही. तसचं मुलांसोबत मिळुन एखादा बाहेर जाण्याचा प्लॅन करा. यावेळी मुलांच्या हट्टापायी तिलादेकील येणं भाग पडेल आणि कदाचित तिचा राग शांत होण्यास मदत होईल.

मुलांसोबत बाहेर असताना दोघांमधील तणाव कमी झाल्याने तुम्हाला तिची समजूत काढणंही सोप जाईल. Happy married life Tips

हे देखिल वाचा-

४. तिच्यासोबत वेळ घालवा- अनेकदा पती पुरेसा वेळ देत नसल्याने महिला नाराज होतात. त्यामुळेच शक्य असेल तेव्हा तिच्यासोबत वेळ घालवा. सुट्टीच्या दिवशी शक्य नसेल तरी ऑफिसमधून आल्यावर खास तिच्यासाठी वेळ द्या. यावेळी ऑफिस किंवा इतर मित्र आणि कामाच्या गोष्टी करणं टाळा.

तिने दिवसभरात काय केलं. येत्या दिवसात तिचे काय प्लन आहेत किंवा तिच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करा. यातून आपोआप कदाचित तिच्या रागाचं कारण कळेल. कदाचित ती एखाद्या चिंतेत असेल तरी त्याबद्दल ती मोकळेपणाने बोलेल. 

५. तिला देखील थोडी विश्रांती द्या- घर सांभाळणं ही एक मोठी जबाबदारी आहे. गृहिणी असो वा नोकरदार महिला ती एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असते. घरातील कामे, मुलांकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देणं अशा कामात ती बऱ्याचदा स्वत:ला वेळ देत नाही. आजारी असेल तरी घरातील काही काम तिला कारावीच लागतात.

त्यामुळेच कधीतरी तिला या कामातून सुट्टी द्या. बऱ्याचदा दिवसभर अनेक काम करून तिची चिडचिड होते. त्यामुळे एकेदिवस तिला बाहेर घेऊन जा किंवा घरात तिला कामं करावी लागणार नाहित याची काळजी घ्या. help wife in household thing

६.तिचं कौतुक करा- कौतुक केलेलं कुणालाही आवडत. पत्नी नाराज आहे किंवा रागात आहे असं निदर्शनास आल्यास तिचं कौतुक करा. मग ते तिच्या कपड्यांबद्दल असो वा जेवणाबद्दल. तिच्यातील काही बदल नोटीस करून त्याचं कौतुक करा. यामुळे तिचा राग नक्कीत शांत होईल.Husband Wife relationship Tips

७. तुमच्या शब्दांवर नियंत्रण- सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शब्दावरील नियंत्रण आणि तुमचा संयम. पत्नी रागावली असताना अनेकदा तिची समजूत काढण्यासाठी पती जातात. मात्र अगदी दोन वाक्यातच ते माघार घेतात. बऱ्याचदा पहिल्याच प्रयत्नात कदाचित तिचा रुसवा जाणार नाही.

यामुळे थोडा संयम राखा लगेचच तुमचा सूर बदलत वाद निर्माण होतील असे काही शब्द वापरू नका. तुम्ही संयम राखला तर कदाचित तिचा राग जाईल आणि कदाचित तीही मोठ्या मनाने तुम्हाला माफ करून तीही तुम्हाला सॉरी म्हणेल. 

याशिवाय पत्नीचा राग दूर करायचा असेल तर आणखी काही छोट्या ट्रीक सहज काम करू शकतील. जसं एखाद्या सुट्टीला तुम्ही पत्नीसाठी चहा आणि ब्रेकफास्ट बनवा make breakfast for wife. किंवा सुट्टीला तिच्यासोबत एकत्र स्वयंपाक करण्याचा प्लॅन बनवा.

यामुळे दोघांना एकत्र चांगला वेळ घालवता येईल आणि नात्यामध्ये आनंद टिकून राहील. तसचं एखाद्या संध्याकाळी कामावरून परतत असताना तिचा एखादा आवडता पदार्थ खाण्यासाठी आणा. सरप्राईज डीनर अरेंज करा. सिनेमाचा प्लॅन करा अशा काही साधारण गोष्टींनी देखील तुम्ही रुसलेल्या आणि रागावलेल्या पत्नीचा राग शांत करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अवादा कंपनीच्या विरोधात उपोषण; उपोषणकर्त्याच्या आईचे निधन, मृतदेह आंदोलनस्थळी, प्रशासनाची धावपळ, तहसीलदारांचे आश्वासन

26 July Flood: वीस वर्षांपूर्वीची 'ती' काळी रात्र : महाडजवळील दरडीत गाडले गेले होते 150 जीव, विलासरावांनी उभा केलेला मदतीचा डोंगर

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! ६ महिने रेशन न घेतल्यास आता कायमचेच रेशनधान्य बंद; प्रत्येक सहा महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून येणार यादी

No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

आजचे राशिभविष्य - 26 जुलै 2025

SCROLL FOR NEXT