डॉ. प्रदीप महाजन
डॉ. प्रदीप महाजन
युथ्स-कॉर्नर

ध्येय ठेवा स्वप्न बाळगा आणि आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखा आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखा : डॉ. प्रदीप महाजन

टीम YIN युवा

मुंबई, ता. ७ : आयुष्यातील प्रत्येक क्षण संधी देणारा असतो. हुशार असण्याची काही गरज नाही. मी शाळेत सुरुवातीला खूप मागे होतो; परंतु नंतर मी एक मोठी उंची गाठली. त्यामुळे तुम्ही भारताचे भावी नेते आहात, भारताची मूलभूत पायाभरणी करत आहात. तुमच्यात निर्माण होणारा प्रत्येक गुण हा यशस्वी होण्यासाठी असेल. आपल्यातील महत्त्वाचे गुण आहेत हे ओळखा, जीवनात खूप साऱ्या अडचणी येतात; मात्र ध्येय ठेवा, स्वप्न बाळगा आणि आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखा, असे आवाहन डॉ. प्रदीप महाजन यांनी केले.

‘यिन’च्या अधिवेशनात डॉ. महाजन यांनी आपल्या यशामागील अनेक अनुभव कथन करत तरुणांना मार्गदर्शन केले. आयुष्यात बदल होईल, असे प्रश्न लक्षात घ्या, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अडचणी महत्त्वाच्या असतात. तुमचे ध्येय ठरवा आणि यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निवडा, असाही सल्ला दिला. तसेच चॉईस आणि चान्स यातील फरक डॉ. महाजन यांनी विद्यार्थांना समजावून सांगितला. आयुष्यात चालत राहा. योग्य मार्ग पकडा. यश तुम्हाला मिळतच राहील. आत्ताचा काळ हा सतत बदलत जाणारा आहे. दहा वर्षांपूर्वी जे होते ते सर्व आता बदलत आहे. सर्व नवीन येत आहे, यशस्वी वेळेला तुम्ही जन्माला आला आहात. त्यामुळे या काळात तुम्ही बदलला नाहीत, तर पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

‘न संपणारा प्रवास’

डॉ. महाजन यांनी या वेळी ‘न संपणारा प्रवास’ ही कविता वाचून देत शिक्षण, ज्ञान हे कसे मोठे असले पाहिजे आणि आयुष्यातील प्रवासात गुंतागुंती कशा होतात, या संदर्भात मार्गदर्शन केले. सुरुवातीला माझ्याकडे ध्येय नव्हते; मात्र ज्या गोष्टीवर मला करिअर करायचे होते, ती गोष्ट मी कधीही उद्यावर सोडली नाही. म्हणून मला यश मिळत गेले. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण संधी देणारा असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT