Camera 
युथ्स-कॉर्नर

स्मार्टफोन नवा घेताय का?

ऋषीराज तायडे

गॅजेट्स - ऋषीराज तायडे
आपल्याकडे अनेक क्षेत्र अशी आहेत, की ज्यामध्ये रोज काही ना काही बदल घडत असतो. त्याला स्मार्टफोन क्षेत्रही अपवाद नाही. नवीन वर्षांत या क्षेत्रात होऊ घातलेल्या नव्या घडामोडींबाबत...

ऑप्टिकल झूमिंग
डिजिटल बाजारात दररोज नवनवीन वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन्स सादर होत असतात. विस्तारत जाणारी मेमरी क्षमता, मेगापिक्‍सल आणि बॅटरी क्षमता हे तीन प्रमुख निकष स्मार्टफोन्स खरेदी करताना लावले जातात. स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पॅनोरोमा, स्लो-मोशन, व्हिडिओ कॅप्चरिंग आदी मर्यादित वैशिष्ट्ये होती. नव्या वर्षांत पाचपट ऑप्टिकल झूमिंग क्षमता असलेले स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. 

किफायतशीर ‘५जी’ स्मार्टफोन्स
गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरातील स्मार्टफोन्स बाजारात आणले होते; मात्र दराच्या तुलनेत त्यातील वैशिष्ट्ये मर्यादित होती. नव्या वर्षात विस्तारणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, किफायतशीर दरात ‘५जी’ स्मार्टफोन्स बाजारात येणार आहे. किफायतशीर दरात ‘५जी’ सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून वेगवान प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम, मीडियाटेकच्या चिपसेटचा वापर करतील, अशी माहिती आहे.

तीव्र स्पर्धा
भारतीय ग्राहकांची अधिक खर्च करण्याची बदललेली मानसिकता लक्षात घेता नव्या वर्षांत २० हजार ते ३० हजार या दरातील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा असण्याची शक्‍यता आहे. तसेच सध्याच्या वैशिष्ट्यांना अधिक प्रगल्भ करत नवनवे वैशिष्ट्ये सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल असणार आहे..

कन्सोल गेमिंग स्मार्टफोनवरच!
गेल्या काही वर्षांत भारतीयांना प्रामुख्याने तरुणांना मोबाईल गेमिंगचे अक्षरशः वेड लागले. ‘पबजी’, ‘फॉर्नाईट बॅटल रॉयल’, ‘कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल’ आदी गेम्सने धुमाकूळ घातला. नव्या वर्षांत गेमिंग क्षेत्रात खास गेम्स सादर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT