Bike
Bike 
युथ्स-कॉर्नर

झूम... : सणासुदीसाठी ‘टॉप गिअर’

सकाळवृत्तसेवा

सणासुदीचे दिवस सध्या सुरू आहेत. त्यामुळे खरेदीचे वातावरणही रंगू लागले आहे. कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे आणि तरुणाईही ‘न्यू नॉर्मल’साठी नव्या वाहनांच्या शोधात आहे. वाहन कंपन्याही हे सगळे गृहीत धरून नवीन बाइक्स बाजारात आणत आहेत. सणासुदीचे वातावरण लक्षात घेऊन काही बाइक्स लाँच झाल्या आहेत, तर काही बाइक्स लाँच होण्याच्या मार्गावर आहेत. टॉप एंडच्या बाइक लाँच होण्याचं प्रमाण यंदाच्या सीझनमध्ये जास्त आहे. अशाच काही बाइक्सची माहिती आपण घेऊ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केटीएम २५० ॲडव्हेंचर
केटीएम इंडियानंही २५० ॲडव्हेंचर या नव्या बाइकच्या लॉंचिंगची तयारी सुरू केली आहे. एक ते पाच हजार रुपये भरून प्री-बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. इंजिन २४८ सीसीचं आहे. टीएफटी डिस्प्ले, ड्युअल चॅनेल एबीएस अशी वैशिष्ट्यं या बाइकची आहेत. सस्पेन्शन वैशिष्ट्यपूर्ण असेल. ट्युबलेस टायर्स आणि अलॉय व्हील्ससहित असलेल्या या बाइकच्या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. तिची किंमत अडीच लाख रुपयांच्या आसपास असेल असं सांगितलं जात आहे. 

२०२१ होंडा सीबी १००० आर
होंडा इंडियानं आपल्या या नव्या बाइकच्या लॉंचची घोषणा केली आहे. याच महिन्यात ती लॉंच होईल, अशी चर्चा आहे. बाइकचं इंजिन ९९८ सीसीचं असेल. बाइकच्या किंमती अजून अधिकृतपणे जाहीर झाल्या नसल्या, तरी ती पंधरा ते सोळा लाख रुपयांच्या पुढे असेल, असं सांगितलं जात आहे. मोटो-जीपीवरून प्रेरित स्टायलिंग, दोन्ही बाजूंना असलेले एअरो-विंग्लेट्स अशी बाइकची वैशिष्ट्यं असतील. टॉप एंडच्या बाइक्स आवडणाऱ्या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून ही बाइक बाजारात आणली जात आहे.

बीएस ६ ड्युकाटी मल्टिस्ट्राडा ९५० एस 
ड्युकाटीनं तिची ‘मल्टिबाइक’ लॉंच केली आहे. सोमवारीच ती भारतात लॉंच झाली. कंपनीनं एक लाख रूपये रक्कम घेऊन प्री-बुकिंग आधीपासूनच सुरू केलं आहे आणि डिलिव्हरी पुढच्या महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे. बाइकचं इंजिन ९३७ सीसीचं असून, ते टेस्ट्रास्ट्रेटा एल-ट्विन लिक्विड-कूल्ड या प्रकारचं आहे. फुल-एलईडी हेडलाइट; हँड्स-फ्री सिस्टिम असलेला टीएफटी डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल अशा वैशिष्ट्यांनी युक्त असलेली ही बाइक किंमतीत मात्र खूपच पुढे आहे. भारतात तिची किंमत तेरा लाख रुपयांच्या पुढे आहे. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT