पुणे वाहतूक पोलीस, मोटार वाहन विभाग, पुणे किंवा खासगी तज्ञ वाहतूक प्रशिक्षक यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले  
युथ्स-कॉर्नर

यिनच्या वतीने पुण्यातील विविध महाविद्यालयात वाहतूक व रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन.

वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य, अधिकाऱ्यांचे मत.

टीम YIN युवा

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात 'यिन' च्या वतीने पुण्यातील विविध महाविद्यालयात सेफ्टी ड्रायव्हिंग संदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ड्रायव्हिंग करत असताना अनेकजण काही छोट्या मोठ्या चुका करत असतात किंवा निष्काळजीपणा करतात. ज्यामुळे इतरांना देखील त्याचा त्रास होऊ शकतो म्हणूनच सुरक्षेच्या कारणासाठी या चुका टाळणे आवश्यक आहे. या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुण्यातील अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापिठाचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, मॉडर्न इस्न्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अश्या विविध महाविद्यालयात या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात पुणे वाहतूक पोलीस, मोटार वाहन विभाग, पुणे किंवा खासगी तज्ञ वाहतूक प्रशिक्षक यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच वाहतूक नियमन करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे या संदर्भात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वाहतूक नियमांच्या प्रचारासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी या महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. या उपक्रमात अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ म्हणाले, 'महाविद्यालयीन जीवनात प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत आवश्यक आहे. एक सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तुमच्यासोबतच इतरांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो ' यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना रस्ते व वाहतूक सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले.

नौरोसजी वाडिया महाविद्यालयात रस्ते व वाहन सुरक्षा जागृती उपक्रमात वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास डोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मॉडर्न इस्न्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट मध्ये रस्ते सुरक्षा जागृती कार्यक्रमात बोलताना मोटार वाहन विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर म्हणाल्या, " रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी कायद्यासोबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय असणेदेखील महत्वाचे आहे. त्यासाठी शिस्तपालन करणारी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांविषयी जाणून घ्यावे व अपघात कमी करण्यासाठी सहकार्य करावे." तसेच या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजयालक्ष्मी श्रीनिवास म्हणाल्या, " वाहन चालवत असताना कोणत्याही विद्यार्थ्याने नियमांचे उल्लंघन करू नये, रस्ता व वाहतूक सुरक्षा जनजागृती उपक्रमाअंतर्गत यिनच्या वतीने आयोजित हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे.

भारती विद्यापिठाचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये आयोजित उपक्रमात वाहतूक तज्ज्ञ संग्राम पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर जीव वाचण्याचे प्रमाण हेल्मेट वापरामुळे अधिक आहे. तसेच प्रत्येकाने लायसन जवळ बाळगणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्याने रहदारी सुरळीत राहण्यास मदत होते. या वेळी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. अजित मोरे, प्राध्यापक डॉ. विजय फाळके यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमातील सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यिन मंत्रिमंडळ सभापती ओंकार डोंबे याने केले. सिद्धेश पाटील याचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT