नसरापूर, ता. १८ : राज्यस्तरीय कुस्ती व वजन उचलणे स्पर्धेचे आयोजन राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक धांगवडी ता. भोर येथे करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भ, मराठवाडा खान्देश मधील एकूण १२ विभागामधील १९८ विदयार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष माजी आमदार सांग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे व विश्वस्त पृथ्वीराज थोपटे यांच्या सहकार्याने प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे, प्राचार्य डॉ. संजय पाटील इस्टेट मॅनेजर राहुल खामकर व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी पार पडली. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी गोरख सरक फलटण व महाराष्ट्र राज्य चॉकबॉल सचिव विजय भोसले हे होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे पंच राजेंद्र वरे, माउली खोपडे, तुषार गोळे, राहुल शेटे, अमित म्हस्के समालोचक रामा गोळे तसेच वेटलिफ्टिंग साठी महाराष्ट्रराज्य वेटलिफ्टिंग असो. पंच प्रशांत बेंद्रे , शरद काळे ,अनंता साने , गणेश नागीने, यांनी काम पहिले. दोन्ही स्पर्ध्येच्या विजेता उपविजेता स्पर्धकांना प्रशिस्ती पत्रक व ट्रॉफीज देऊन राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक तर्फे गौरवण्यात आले.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा निकाल-
५७ किलो विजेता - येलगुडे रविराज ( इचलकरंजी)
उपविजेता - गौरव पाटील ( नाशिक)
६१ किलो विजेता - ठावरे पियुष ( उदगीर)
उपविजेता - शुभम पाटील ( कोल्हापूर)
६५ किलो विजेता- सिद्धार्थ वाघ ( धुळे)
उपविजेता - राज शेलार ( श्रीगोंदा)
७० किलो विजेता - अर्जुन शिंदे ( अहिल्यानगर )
उपविजेता - हवालदार सुमज ( सोलापूर)
७४ किलो विजेता - स्वराज धुमाळ ( पुणे )
उपविजेता - विश्वजित थोरवे ( पुणे )
८६ किलो विजेता - निखिल पाटील ( कराड )
विजेता - गौरव करचे ( बेलवंडी )
९७ किलो विजेता - वाघमोडे संकेत ( पानीव )
उपविजेता - नलावडे ज्ञानेश ( पुणे)
१२५ किलो विजेता - झिंग्रे राजवर्धन ( पानीव )
उप विजेता - ठोंबरे करणं ( वाघोली पुणे )
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा निकाल -
५६ किलो विजेता - प्रतीक गोसावी ( कर्जत)
उपविजेता - अथर्व कदम ( वडाळा मुंबई )
६२ किलो विजेता - ओम मोरे ( जुन्नर)
उपविजेता - वेदांत गायकवाड ( रोहा)
६९ किलो विजेता - केतन सोनावणे ( वडाळा मुंबई )
उपविजेता - यश सुपेकर ( पंढरपूर)
७७ किलो विजेता -ओंकार धिंडे ( पेठ सांगली)
उपविजेता - रितेश शेवाळे ( वडाळा मुंबई )
८५ किलो विजेता - पार्थ परब ( मुंबई )
उपविजेता - प्रथमेश मानेदेशमुख ( अकलूज)
९४ किलो विजेता - सारंग पाटील ( पानीव )
उपविजेता - आयुष वीर ( भोर)
१०५ किलो विजेता - संकेत वाघमोडे - ( पानीव )
उपविजेता - श्रेयश काकडे ( पिंपरी -चिंचवड)
१०५ किलो पुढे - राजवर्धन झिंग्रे ( पानीव )
उपविजेता -सुपांशव खोत ( शिरोळ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.