युथ्स-कॉर्नर

राजगड ज्ञानपीठात सावित्रीबाई फुले जयंती उत्सव...

कर्करोगावर ज्ञान आणि नारी सुरक्षेवर सशक्त संदेश.

टीम YIN युवा

नसरापूर, ता. ३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राजेश्वरी जानकीरामन (प्राचार्य किंग स्टोन सीबीएससी अंकुरम स्कूल हांडेवाडी) उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने झाली. यामध्ये मुख्य पाहुण्यांनी महिला व कर्करोग या विषयावर उपयुक्त माहिती दिली. त्यात त्यांनी कॅन्सरच्या लक्षणांपासून ते उपचार पर्यायांपर्यंत विविध बाबींवर प्रकाश टाकला. तसेच अठरावर्षा खालील मुलींना लसीकरण चे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रथमवर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांनी 'महिला सुरक्षा' या महत्त्वाच्या मुद्द्यावर आधारित सुंदर पथनाट्य सादर केले. पथनाट्याने महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नृत्य आणि पोवाडा सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि अभिनयाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची गोड आठवण जागवली.

कार्यक्रमाच्या दरम्यान, प्रमुख पाहुणे तसेच कॉलेजचे कार्याध्यक्ष संग्रामदादा थोपटे, सचिवा स्वरूपाताई थोपटे, इस्टेट मॅनेजर खामकर सर, डिग्री प्राचार्य एस. बी. पाटील, डिप्लोमा प्राचार्य प्रोफेसर डी.के. खोपडे, अनंत निर्मल ग्लोबल स्कुल प्राचार्य रुबीना शेख, प्रोफेसर डी.जे. ननावरे, प्रोफेसर एस.एस. खुटवड तसेच सर्व विभाग प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्राचार्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांचा भारतीय समाजावर झालेला प्रभाव यावर भाषण केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डिग्री कॉलेज प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रोफेसर काळे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT