युथ्स-कॉर्नर

संजीवनी महाविद्यालयात यिन प्राइम मेंबरशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद.

टीम YIN युवा

चापोली :

चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी महाविद्यालयात सकाळ माध्यम समूहाच्या 'यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क ' यिन च्या प्राइम मेंबरशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून महाविद्यालयीन युवक युवतींना नेतृत्व विकासाची संधी उपलब्ध करून देत आहे. यिन च्या माध्यमातून मिनी मंत्री मंडळ स्थापन करून यातून महाविद्यालयातील युवक युवतींना मंत्रिमंडळात स्थान दिले जाते. यातून आपली लोकशाही कशा प्रकारे चालते याचे ज्ञान प्रत्यक्षात मिळण्यासाठी यिन व्यासपीठ कार्य करत आहे. महाविद्यलाय अध्यक्षापुरतेच कार्य न थांबता 'प्रति विधानसभा सदस्य' बनून प्रशासनाचा जवळून अभ्यास करण्याची नवीन संधी यिन ने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी ९९९ रुपये भरून यिनची प्राइम मेंबरशिप घेतली आहे त्यांना लॅपटॉप बॅग, पाण्याची बॉटल, बॅज, की चेन, सोशल इम्पॅक्ट स्टिकर्स देण्यात आले. तसेच सकाळ माध्यम समुहाच्या एसआयआयएलसी च्या वतीने चार हजार रुपयाचे ऑनलाईन बेसिक वर्कशॉप व विठू प्रो तर्फे ४९९९ रुपयांचा ए.आय चा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स मोफत मिळणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त विविध फ्री गिफ्ट व्हाउचर्स देण्यात आले.

खास यिन मेंबर्स साठी यिन कला महोत्सव, यिन समर युथ समिट असे विविध मोफत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यावेळी संजीवनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे, संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्ती सरपंच डॉ. भालचंद्र नारायणराव चाटे, प्रा. डॉ. नारायण जायभाये, प्रा.डॉ. रविंद्र भताने, प्रा. डॉ. वाजिद कादरी, प्रा. डॉ. धीरज व्हत्ते, प्रा. डॉ. गौतम बनसोडे, प्रा. बालाजी घुले, प्रा. लक्ष्मण पिंपळपल्ले, प्रा. डॉ. एम. डी पठाण, प्रा. धनंजय तिगोटे, प्रा. डॉ. जनार्धन माने, प्रा. राहुल धवसे, प्रा. प्रीती खरात, प्रा. डॉ. शेख एम एस., प्रा. सिद्दीकी मुजाहिद, प्रा. डॉ. श्रीधर बनसोडे, प्रा सचिन बोबे, प्रा. डॉ. चंदन बावलगावे, प्रा. डॉ. सचिन चोले, प्रा. डॉ. रोहित चव्हाण, प्रा. डॉ.सुनील गायकवाड, प्रा. सदानशीव एस व्ही, प्रा. डॉ. भागवत फुलमंटे, प्रा. मनीष आमलावणार, प्रा. तुकाराम मुंढे सह मोठ्यासंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

यिन प्राइम मेंबरशिप व यिन नेतृत्व विकास कार्यक्रमात (महाविद्यालयीन निवडणूक) सहभागी होण्यासाठी लातूर जिल्हा यिन अधिकारी अमर साखरे - 9665128871 यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ माध्यम समूहाच्या यिन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुणांचा विकास होण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही तर विद्यार्थ्यांनाच सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. यिन च्या माध्यमातून हाच सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार आहे.
प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे, संजीवनी महाविद्यालय चापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT