पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी – महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा एकत्रित सहभाग. वाघिरे महाविद्यालय सासवड
युथ्स-कॉर्नर

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात साजरी.

सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव; प्राचार्य व उपप्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन

टीम YIN युवा

सासवड, ता. ३ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य डॉ. संजय झगडे व उपप्राचार्य डॉ. बबन माने यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ नानासाहेब पवार यांनी केली. त्यानिमित्त त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली.

उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत सामाजिक व शैक्षणिक मूल्ये रुजविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे असे सांगितले. या प्रसंगी लघुलिपिका सौ मीरा चिकणे व श्री किशोर राऊत यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवल्लेख केला. कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक श्री अशोक कोंढवळे, जूनियर विभागाचे उपप्राचार्य श्री बाळासाहेब काळे सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT