esakal | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; DA मध्ये होणार वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Salary

7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगांतर्गत सरकारने डीएमध्ये वाढ केल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही लक्षणीय वाढणार आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; DA मध्ये होणार वाढ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

7th Pay Commission: नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA) वाढ करण्यात येणार आहे. याचा फायदा ५० लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच ६५ लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI)च्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२१ दरम्यान डीएमध्ये कमीत कमी ४ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे.

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन डीए लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. यामध्ये जानेवारी ते जून २०२० पर्यंतच्या डीएमध्ये ३ टक्के वाढ आणि जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत ४ टक्के वाढ तसेच जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत ४ टक्के वाढ समाविष्ट आहे.

SBIची मोठी घोषणा; घरबसल्या घ्या ८ सेवांचा फायदा​

सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सरकारने डीएला स्थगिती दिली होती. डीए ज्या प्रमाणात वाढेल, त्याच प्रमाणात डीआरही वाढणार आहे. महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या डीआर (Dearness Relief) मध्येही वाढ होणार आहे. 

‘पीपीएफ’कडे आजच लक्ष का द्यायला हवे?​

पगार वाढणार
सातव्या वेतन आयोगांतर्गत सरकारने डीएमध्ये वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगारही लक्षणीय वाढणार आहेत. सध्या मूळ वेतनाच्या १७ टक्के डीए दिला जातो. जेव्हा डीए १७ हून २८ टक्के (१७+३+४+४) केला जाईल, तेव्हा पगारामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. डीएमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) मध्येही वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा पीएफ हा मूळ वेतनासह डीए या सूत्रानुसार दिला जातो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. 

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top