
14 हजार प्रति महिना प्रमाणे वर्षाला 1.7 लाख रुपये उत्पन्न दाखवणाऱ्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचे स्विस बँकेत खाते आहे. या खात्यमध्ये तब्बल 196 कोटी रुपये काळा पैसा जमा आहे.
दोन लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असल्याचा दावा करणाऱ्या 80 वर्षीय आजीबाईंच्या स्विस बँक खात्यात तब्बल 196 कोटी रुपये इतका काळा पैसा असल्याचे समोर आले आहे. मुंबई शाखेच्या प्राप्तिकर अपील लवादा(आयटीएटी)च्या आदेशानंतर संबंधीत प्रकरणातील आरोपी वृद्ध महिलेला उत्पन्न लपवून काळा पैसा बाळगल्याप्रकरणी दंडही भरावा लागणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत चीन, रशियाचा हस्तक्षेप
14 हजार प्रति महिना प्रमाणे वर्षाला 1.7 लाख रुपये उत्पन्न दाखवणाऱ्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचे स्विस बँकेत खाते आहे. या खात्यमध्ये तब्बल 196 कोटी रुपये काळा पैसा जमा आहे. रेणू थरानी असे या वृद्ध महिलेचे नाव असून एसबीसी जिनेव्हा बँकेत थरानी कुटुंबियांच्या ट्रस्टच्या नावे खाते आहे. सध्याच्या घडीला त्या खात्याच्या एकमेव लाभार्थी आहेत. केमन आर्यर्लंड जीडब्ल्यू गुंतवणुकीच्या आधारावर 2004 मध्ये संबंधित खाते उघडण्यात आले होते. या कंपनीने व्यवस्थापकाच्या रुपात निधी कुटुंबियांच्या ट्रस्टसाठी असलेल्या खात्यात जमा केला होता.
कोरोनावरील लस अन् त्याची चाचणी; जाणून घ्या भारतासह कोणत्या देशात काय सुरुय
थरानीने 2005-06 मध्ये दाखल केलेल्या प्राप्ती कर विवरणामध्ये याचा उल्लेख केला नव्हता. 31 ऑक्टोबर 2014 मध्ये या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करण्यात आला होता. मात्र थरानी यांनी एचएसबीसी जिनेव्हामध्ये कोणतेही खाते नसल्याचे प्रतिज्ञा पत्र दिले होते. एवढेच नाही तर जीडब्ल्यू इन्वेस्टमेंट बँकेत व्यवस्थापकीय पदावरही नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 2005-06 च्या प्राप्तीकर विवरण पत्रात त्यांनी वार्षिक उत्पन्न 1.7 लाख असल्याचे नमूद केले होते. यामध्ये त्यांनी बंगळुरुचा पत्ता नोंदवला होता.