
Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! 'ही' आयटी कंपनी देणार प्रत्येक शेअरमागे...
Share Market : एक्सिलिया सॉल्यूशंस इंडिया लिमिटेडच्या (Accelya Solutions India Limited) निव्वळ नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 48.47% वाढ झाली आहे.
कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या बोर्डाने पात्र भागधारकांना प्रत्येक शेअरवर 35 रुपये अंतरिम लाभांश (Interim Dividend) देण्याच्या निर्णयाला मान्यता दिल्याचे सांगितले.एक्सिलिया सॉल्यूशंसने 2 फेब्रुवारी ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे
कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 24 जानेवारीला झालेल्या बैठकीत प्रति शेअर 35 रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेअर बाजाराला दिली. यासाठी रेकॉर्ड तारीख 2 फेब्रुवारी 2023 आहे. तर लाभांश भरण्याची तारीख मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 आहे.
एक्सिलिया सॉल्यूशंसचे शेअर्स सध्या 1,460 रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 8.21% वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याची किंमत सुमारे 40.94% वाढली आहे.
यापूर्वी एक्सिलिया सॉल्यूशंसने सप्टेंबर तिमाही निकालानंतरही पात्र भागधारकांना प्रति शेअर 45 रुपये लाभांश दिला होता. याची रेकॉर्ड डेट 6 ऑक्टोबर 2022 होती. दोन्ही लाभांशाची रक्कम एकत्रित केल्यास, या आर्थिक वर्षात कंपनीने आतापर्यंत आपल्या भागधारकांना प्रति शेअर 80 रुपये लाभांश जाहीर केला आहे.
हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा
मंगळवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना, एक्सिलिया सॉल्यूशंसने सांगितले की, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 16.98 कोटींच्या तुलनेत या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 48.47% ने वाढून 25.21 कोटी झाला आहे.
त्याच वेळी, डिसेंबर तिमाहीत कंपनीची विक्री 28.55% ने वाढून 112.04 कोटी झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 87.16 कोटी होती.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.