आदित्य बिर्ला ग्रुपचा 'हा' शेअर येत्या काळात चांगला वधारणार!

ग्रासिमने व्यवसाय विस्ताराच्या व्यतिरिक्त पेंट्स विभागात एन्ट्री केली आहे.
Grasim Industries Ltd
Grasim Industries Ltdesakal
Summary

ग्रासिमने व्यवसाय विस्ताराच्या व्यतिरिक्त पेंट्स विभागात एन्ट्री केली आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचा (Aditya Birla Groups) ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड (Grasim Industries Ltd) येत्या काळात चांगला परफॉर्म करेल असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आदित्य बिर्ला ग्रुपचा ग्रासिमच्या शेअरवर आपले रेटिंग 'न्यूट्रल' वरून 'बाय' (Buy) केले आहे, अर्थात त्यांनी हे शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारातील (Share market) अस्थिरतेच्या काळात तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी (Portfolio) दर्जेदार स्टॉक (Stock) शोधत असाल, तर आदित्य बिर्ला समूहाची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड (Grasim Industries Ltd) हा एक चांगला पर्याय असू शकतो. ग्रासिमने व्यवसाय विस्ताराच्या व्यतिरिक्त पेंट्स विभागात एन्ट्री केली आहे. यामुळे कंपनीला येत्या काळात चांगली वाढ अपेक्षित आहे. हीच वाढ लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ग्रासिमच्या स्टॉकचे रेटिंग 'न्यूट्रल' वरून 'बाय' केले आहे. या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 80 टक्के इतका मजबूत परतावा मिळाला आहे.

Grasim Industries Ltd
आदित्या बिर्ला सन लाईफचा IPO केव्हा येणार? जाणून घ्या, शेअरचा भाव?

ग्रासिम: येत्या काळात 14 टक्के रिटर्न

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ग्रासिमच्या शेअरवर 2,050 रुपयांच्या टारगेटसह 'बाय' रेटींग दिली आहे. 7 जानेवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 1799.95 रुपये होती. म्हणजेच आता यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 14 टक्के परतावा मिळू शकतो. या शेअरचा गेल्या एक वर्षाचा रिटर्न चार्ट पाहिल्यास, गुंतवणूकदारांना यामध्ये आतापर्यंत सुमारे 80 टक्के परतावा मिळाला आहे.

कॉटन इंडस्‍ट्रीमध्ये होत असलेल्या बदलांचा फायदा ग्रासिमला मिळू शकतो असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. FY25E पर्यंत, VSF ची मागणी कापसापेक्षा जास्त असू शकते. याशिवाय अमेरिकेतील शिन जियांग प्रांतातून कापूस आयात बंदीचा लाभ कंपनीला मिळू शकतो असेही ते म्हणणे आहे. ग्रासिम ही जगातील सर्वात मोठी VSF उत्पादक आहे. कंपनीने VSF/कॉस्टिक सोडा विभागातील क्षमता 37 टक्के/33टक्के ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या केमिकल सेगमेंटमध्ये वाढी अपेक्षा आहे. VSF/केमिकल बिझनेसची वाढ FY21-24 मध्ये 16 टकके/15 टक्के CAGR असण्याची शक्यता आहे.

Grasim Industries Ltd
टाटा-बिर्ला-अंबानी व्हायचंय? 'असे' मार्ग जे तुम्हाला श्रीमंत बनवतील

ग्रासिम पेंट्स व्यवसायात उतरली आहे. ग्रासिमचा ब्रँड रिकॉल तसेच कंपनीचा बँलेन्सशीटही मजबूत आहे. कंपनीकडे व्हाईट पेंट्स विभागात UTECM चे डिस्ट्रिब्‍यूशन नेटवर्क आहे. या सगळ्याच गोष्टींचा फायदा ग्रासिमला येत्या काळात होण्याची दाट शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com