प्राप्तिकराच्या मागणीला उत्तर कसे द्याल?

ॲड. सुकृत देव
Monday, 23 November 2020

केंद्र सरकार अणि प्राप्तिकर विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘फेसलेस ॲसेसमेंट’ या संकल्पनेच्या आधारे ‘ई-अॅसेसमेंट’अंतर्गत प्राप्तिकर भरण्याची मागणी करण्यात येत आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर करदात्यांना त्याची पोचपावती व सूचनापत्र (इंटिमेशन) आलेले असेल. विवरणपत्राची शहानिशा केल्यानंतर करदात्याला देय प्राप्तिकर भरण्याची मागणी कलम १४३ (१)नुसार करण्यात येते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकार अणि प्राप्तिकर विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘फेसलेस ॲसेसमेंट’ या संकल्पनेच्या आधारे ‘ई-अॅसेसमेंट’अंतर्गत प्राप्तिकर भरण्याची मागणी करण्यात येत आहे. असा कर भरण्याची मुदत ही मागणीची नोटीस आल्यापासून ३० दिवसांची असते. अशी नोटीस आल्यानंतर त्याला व्यवस्थित, मोजक्या शब्दांत उत्तर पाठविणे गरजेचे असते. त्यासाठी चार पर्याय दिले आहेत. ते असे...

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1 मागणी बरोबर आहे.
प्राप्तिकर खात्याने केलेली मागणी करदात्याला जर मान्य असेल, तरच हा पर्याय त्याने निवडावा. 

2 मागणी अर्धीच बरोबर आहे.
या पर्यायानुसार करदात्याला मागणी केलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम किंवा ठरावीक रक्कमच मान्य असेल, तर उरलेली रक्कम का मान्य नाही, याचे कारण किंवा स्पष्टीकरण ३० ते ४० शब्दांत देणे आवश्यक आहे.

हेल्मेट न वापरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

3 मागणी अमान्य आहे.
या पर्यायानुसार करदात्याला संपूर्ण मागणीच अमान्य असेल, तर त्याचे कारण पाठविणे आवश्यक आहे.  

4 मागणी बरोबर नाही; पण समायोजनास तयार आहे.
जेव्हा करदात्याकडे पैसे भरल्याचा पुरावा नाही, पैसे भरल्याची पोचपावती नाही, मागणीची रक्कम छोटी आहे अणि रिफंड वा परतावा रक्कम जास्त येत असल्यामुळे समायोजन सहजरीत्या होऊ शकते, अशा वेळी हा पर्याय निवडता येतो.

पर्याय क्र. २ व ३ नुसार, करदात्याने कारण वा स्पष्टीकरण कसे द्यायचे, ते बघूया.

१) ‘‘मागणी केलेली रक्कम भरली आहे; पण ही रक्कम फॉर्म २६ एएसमध्ये दिसत नाही, रक्कम भरल्याची पोचपावती जोडत आहे.’’ 

NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

२) ‘‘करवितरक वा करवजावटदाराने चुकून माझा ‘पॅन’ टाकला, जो त्याने दुसऱ्या व्यक्तीचा ‘पॅन’ टाकणे अपेक्षित होते, त्यामुळे उत्पन्न स्रोत व करवजावट माझ्या फॉर्म २६ एएसमध्ये दिसले; पण माझ्या विवरणपत्रात न दिसल्याने, ही मागणी आली आहे. आता करवितरक वा वजावटदाराने या चुकीच्या दुरुस्तीसाठी सुधारित (रिव्हाइज्ड) करवजावट विवरणपत्र दाखल केले आहे, त्यामुळे आता उत्पन्न स्रोत व करवजावट माझ्या फॉर्म २६ एएसमध्ये दिसणार नाही.’’ 

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

करदात्याने पर्याय क्र. २  किंवा क्र. ३ ला उत्तर दिले असेल, तर त्या उत्तराबरोबर त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्याची ऑनलाइन प्रत पाठविणे गरजेचे आहे. हा पुरावा प्राप्तिकरदात्याने जोडला नाही, तर मागणी रद्द वा बाद होणार नाही. कारण, या उत्तराची वा कारणाची शहानिशा प्राप्तिकर विभाग करणार आहे, हे लक्षात ठेवावे.
(लेखक कर सल्लागार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advocate sukrut dev write article income tax