
दुबईकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एक प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने यूएई सरकारने एअर इंडियाच्या सर्व विमान सेवा २ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दुबई/नवी दिल्ली - दुबईकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एक प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने यूएई सरकारने एअर इंडियाच्या सर्व विमान सेवा २ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दुबई नागरी उड्डयण प्राधिकरणाने जारी केलेल्या एका निवेदनात सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काही दिवसांपूर्वी जयपूरहून दुबईकडे येणाऱ्या विमानात एक प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने एअर इंडियाचे दुबईची सर्व उड्डाणे पुढील पंधरा दिवसांसाठीच म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत रद्द केले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यूएई सरकारच्या नियमानुसार, भारतातून दुबईकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रवासाच्या ९६ तास अगोदर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल आणि निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगावे लागेल. २ सप्टेंबर रोजी ज्या प्रवाशाने एअर इंडिया एक्स्प्रेस ‘जयपूर-दुबई असा प्रवास केला तो कोरोनाबाधित होता. असाच कोरोनाबाधित रुग्ण यापूर्वीच्याही एका उड्डाणात आढळून आला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत एअर इंडिया एक्स्प्रेसचे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबाबत एअर इंडिया एक्स्प्रेसने प्रवाशांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा