अनिल अंबानी डिसेंबरपर्यंत बंद करणार दोन कंपन्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे.

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या दोन वित्तीय कंपन्या, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन कंपन्या डिसेंबरअखेर बंद होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची एकत्रित मालमत्ता 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा दोन वर्षांपूर्वी बंद पडलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन नंतर अनिल अंबानी समूहाचा हा दुसरा मोठा व्यवसाय बंद पडतो आहे.

रिलायन्स कॅपिटल विमा आणि म्युच्युअल फंड व्यवसायातसुद्धा आहे. रिलायन्स कम्युनिकेशन आता दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरा जात आहे. अनिल अंबानींची संरक्षण क्षेत्रातील कंपनी रिलायन्स नेव्हल ही आधीच आर्थिक संकटात आहे.

Vidhan Sabha 2019 : पठ्ठ्याने भरला चक्क हेलिकॉप्टर मधून येत उमेदवारी अर्ज (व्हिडिओ)

व्यवसायातील बदलानुसार रिलायन्स कॅपिटलने कर्ज वितरणाच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचे ठरवले आहे. रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन्ही कंपन्या आपल्या कर्जदारांशी आणि गुंतवणूकदारांशी अंतिम तोडग्यावर चर्चा करत असून, डिसेंबरपर्यत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती अनिल अंबानी यांनी दिली आहे. या प्रक्रियेनंतर रिलायन्स कॅपिटलवरील कर्ज कमी होऊन 25,000 कोटी रुपयांवर येईल अशी अपेक्षा आहे.

Vidhan Sabha 2019 : भाजपकडून नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रिलायन्स कॅपिटलची स्थापना 15 वर्षांपूर्वी झाली होती. कंपनीतील 30,000 कर्मचारी काम करतात. वित्तीय सेवा क्षेत्रातील संकटे, ऑडिटर्सची चुकीची पावले, क्रेडिट रेटिंग एजन्सींची चुकीची पावले आणि अर्थव्यवस्थेतेचे मंदावणे या सर्व घटकांना अनिल अंबानींनी कंपनीवर येणाऱ्या संकटांसाठी जबाबदार ठरवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Ambani to close two companies by December