esakal | कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांचं घर किती हजार कोटींचं?
sakal

बोलून बातमी शोधा

anil ambani house price

एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी आज  कर्जबाजारी झाले आहेत. कर्जाची परतफेड न केल्यामुळे तीन चिनी बँकांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही अनिल अंबानी यांना बजावली आहे.

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांचं घर किती हजार कोटींचं?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी आज  कर्जबाजारी झाले आहेत. कर्जाची परतफेड न केल्यामुळे तीन चिनी बँकांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही अनिल अंबानी यांना बजावली आहे. अनिल अंबानी यांच्यावर तीन चिनी बँका, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि डेव्हलपमेंट बँक ऑफ चायना यांचं जवळपास 5 हजार 276 कोटी रुपये कर्ज आहे.

 हे प्रकरण सध्या ब्रिटनमधील कोर्टात सुरू आहे. शुक्रवारीच्या सुनावनीदरम्यान न्यायालयात अनिल अंबानी म्हणाले होते की, कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत आणि ते कुटुंबाचे दागिने विकून वकिलाची फी भरत आहेत. अनिल अंबानी त्यांच्याकडे पैसे नाहीत असं सांगत आहेत, तरीही त्यांची जीवनशैली एकदम महागडी असल्याचे दिसत आहे.

चीनसह पूर्व आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा संसर्ग
 
एका रिपोर्टनुसार, मुंबईच्या पाली हिल परिसरात अनिल अंबानी यांचे घर आहे. अनिल अंबानी ज्या घरात राहतात ते घर हे भारतातील दुसरे सर्वात महागडे घर असून त्याची किंमत सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे. अनिल अंबानींना या घराची उंची 150 मीटर वर ठेवायची होती, पण त्यांना अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाले नव्हती. या घरात जिम, स्विमिंग पूल अशा अनेक आधुनिक सुविधा आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरानंतर हे घर देशातील सर्वात महागडे घर आहे.

सोनं घ्या सोनं! आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर

अनिल अंबानींच्या घरात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. हे घर खूप मोठं आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी खूप मोठा खर्चही येतो. घरात अनेक भव्य खोल्या आहेत. इंटिरिअर फर्निचरवर बराच खर्च करण्यात आला आहे. या घरात अनेक मोठी हॉल आहेत, जी पूर्णपणे आधिनिकतेने सुसज्ज आहेत.  अनिल अंबानी यांच्या घराचे वीज बिल आठ महिन्यांत 60 लाख रुपये आले आहे. न्यायालयाने एवढे मोठे वीज बिल भरण्याबाबत विचारले असता अनिल अंबानी म्हणाले की, वीज कंपनी खूप चढ्या दराने बील घेत असल्याचे त्यांनी सांगितलं 

2 मे 2020 ला ब्रिटनमधील न्यायलयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना तीन चिनी बँकाकडून घेतलेले कर्ज देण्याचे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने 12 जून 2020 पर्यंतची मुदत दिली होती. अनिल अंबानी यांनी चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँक तिन्ही बँकांचे मिळून जवळपास 5 हजार 281 कोटी कर्ज घेतले होते. आतापर्यंत अनिल अंबानी कर्जाची परतफेड करू न शकल्यानं तीन चिनी बँका आक्रमक झाल्या आहेत. या बँकांनी म्हटलंय की, अनिल अंबानी यांच्याकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा पाठपुरावा करणार आहोत.

(edited by- pramod sarawale)