esakal | सोनं घ्या सोनं! आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर
sakal

बोलून बातमी शोधा

gold and silver

मागील 5-6 महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक न करता अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत असल्यांचं दिसत आहेत

सोनं घ्या सोनं! आत्ताच सोने खरेदी करणे ठरू शकतं फायदेशीर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील 5-6 महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक न करता अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत असल्यांचं दिसत आहेत. याचाच परिणाम सध्या देशातील सोन्याचे दर जवळपास 50 हजारापर्यंत आले आहेत. येणारा ऑक्टोबर महिना भारतात मोठ्या प्रमाणात सणासुदींचा आहे, त्या काळात सोन्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे सोने आत्ताच खरेदी करणे फायदेशीर ठरू शकतं, असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.  

ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहचल्या होत्या. एका दिवसाच्या वाढीनंतर आज सोन्याचे भाव पुन्हा घसरले आहेत. एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या किंमती 0.5 टक्क्यांनी घसरून  प्रतिग्रॅम 50 हजार 386 झाल्या आहेत. मागील तीन दिवसातील सोन्याच्या दरातील ही दुसरी घसरण आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करणे फायदेशीर ठरेल, असं तज्ज्ञांनी मत मांडलं आहे.

चीनसह पूर्व आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा संसर्ग

मागील सत्रात सोने एका टक्क्याने म्हणजे 500 रुपयांनी वाढले होते, तर चांदीचे दर प्रतिकिलो 1900 रुपयांनी वाढले होते. 7 ऑगस्टला सोन्याचे दर विक्रमी 56 हजार 200 रुपये पर्यंत गेले होते. त्यांनंतर सोन्याचे दर लक्षणीय घसरण होऊन 49 हजार 500 पर्यंत आले होते. 

जागतिक बाजारपेठेत (global gold market) सोन्याच्या भावातही घसरण झाली आहे. स्पॉट सोन्यात किंमती  प्रति औंस 0.1 टक्के घसरून 1896.03 डॉलरवर आलं आहे. चांदीचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 24.22 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

देशात 1 ऑक्टोबरपासून नवे नियम; बेकरी पदार्थ,वाहतूक नियम ते विमा पॉलिसीत होणार बदल

मागील महिन्याच्या तुलनेत सोने 6800 रुपयांनी स्वस्त-
मागील महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याच्ये वायदे बाजारातील बाजारातील दर सर्वोच्च पातळीवर गेले होते. सोन्याच्या किंमती विक्रमी 56 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचल्या होत्या. मागील आठवड्यातील शुक्रवारपर्यंत सोने प्रति १० ग्रॅम 49 हजार रुपयांच्या किमान पातळीवर पोहोचले होते. म्हणजे जवळपास एका महिन्याच्या आत सोन्याचे दर 6 हजार 820 रुपयांनी घसरले होते.