
अंबानींना लंडनमधील न्यायालयाने चिनी बँकांची देणी लवकर फेडण्याचे आदेश दिले आहेत. कर्जफेड न केल्यास तुरुंगात देखील जावे लागेल असा इशारा न्यायालयाने अनिल अंबानींना दिला आहे.
मुंबई - अनिल अंबानी यांच्या समोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अंबानी दिवाळखोर झाले असून बँकांची कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अंबानींना लंडनमधील न्यायालयाने चिनी बँकांची देणी लवकर फेडण्याचे आदेश दिले आहेत. कर्जफेड न केल्यास तुरुंगात देखील जावे लागेल असा इशारा न्यायालयाने अनिल अंबानींना दिला आहे. परिणामी आता अंबानींनी पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
अंबानी दिल्लीतील वीज पुरवठा करणारी रिलायन्स इन्फ्रामधील हिस्सा विक्री करणार आहे. रिलायन्स इन्फ्रासाठी आतापर्यंत तीन कंपन्यांनी बोली लावली आहे.
* अंबानी रिलायन्स इन्फ्रामधील हिस्सा विक्री करणार
* रिलायन्स इन्फ्रासाठी आतापर्यंत तीन कंपन्यांची बोली
* अंबानींना लंडनमधील न्यायालयाचे चिनी बँकांची देणी लवकर फेडण्याचे आदेश
* रिलायन्स समूहाचे बाजार मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज
* दिल्लीतील वीज पुरवठा करते रिलायन्स इन्फ्रा
रिलायन्स इन्फ्राच्या दिल्लीतील व्यवसासाठी इटलीतील एनेल समूहाने उत्सुकता दर्शविली आहे. शिवाय ग्रीनको आणि टोरंट पॉवर या दोन कंपन्यांनी देखील लिलावात सहभाग घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही कंपन्यांनी शुक्रवारी निविदा सादर केल्या आहेत. रिलायन्स समूहाचे बाजार मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कोरोना काळात पॉलिसीचा प्रीमियम चुकवू नका रे...!
कंपनीने लिलावासाठी केपीएमजी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स इन्फ्राची बीएसईएस राजधानी पॉवर आणि बीएसईएस यमुना पॉवर या दोन कंपन्यांमध्ये 51 टक्के हिस्सेदारी आहे. तर उर्वरित 49 टक्के हिस्सा दिल्ली सरकारचा आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या दोन कंपन्यांकडून दिल्लीतील सुमारे 93 टक्के ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.
दोन वर्षांपूर्वी अंबानी यांनी मुंबईतील वीज वितरण व्यवसाय अदानी ट्रान्समिशन कंपनीला 18 हजार 800 कोटी रुपयांना विकला होता. आता मात्र दिल्लीतील लिलावात अदानी समूहाने सहभाग घेतलेला नाही.