वेळेवर करा सेवानिवृत्तीचे नियोजन!

Retirement-planning
Retirement-planning

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, लोक जीवनातील विविध कर्तव्यांमुळे सेवानिवृत्तीचे नियोजन करणे टाळतात. परिणामी वेळ निघून गेल्यावर लोकांना सेवानिवृत्ती हे स्वातंत्र्य नाही, तर बंधन वाटू लागते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की सेवानिवृत्तीची योजना ही ठरवून करण्याची बाब आहे; नशिबाने होणारी नव्हे!

निवृत्ती नियोजनाचा विचार कशासाठी?
निवृत्तीला बहुतेक वेळा जीवनाचा ‘सुवर्ण कालखंड’ म्हणून संबोधले जाते. त्या वेळेपर्यंत आपण आपल्या बहुतेक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडलेल्या असतात. परंतु, आपण सेवानिवृत्तीचे नियोजन केले असेल तरच या सर्व गोष्टींचा आपल्याला मनापासून आनंद घेता येतो. सेवानिवृत्तीच्या वयात आपल्याला उद्भवणारी मुख्य आव्हाने आर्थिक स्वरूपाची असतात. कारण निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न नसते. विशेषतः आपल्याला चांगली पेन्शन मिळत नसल्यास, ही आव्हाने अधिक तीव्र असतात. तारुण्यात असताना सेवानिवृत्तीबद्दल विचार करणे जरा विचित्र वाटेल, परंतु वाढते आयुर्मान, वाढती महागाई, कमावत्या जीवनाचा कमी कालावधी, सेवानिवृत्ती फंडासाठी कर्जाची अनुपलब्धता आणि वैद्यकीय खर्चाच्या वाढीमुळे उतारवयाचे नियोजन सुरू करणे गरजेचे असूनही केले जात नाही. या सर्वांचा विचार करता सेवानिवृत्तीसाठीची बचत ही छोट्या गुंतवणुकीने लवकर सुरू करावी, ज्यायोगे दीर्घ मुदतीत पैशाची चांगली बचत होईल. 

म्युच्युअल फंडासह निवृत्तीचे नियोजन
तरुणपणातच सेवानिवृत्तीचे नियोजन केले, तर पुरेसा सेवानिवृत्ती निधी जमा होण्याची शक्यता जास्त असेल. ‘उत्पन्न - गुंतवणूक = खर्च’ असा नियम पाळला पाहिजे.सेवानिवृत्तीचे नियोजन ही काही अल्प मुदतीची कसरत नसून, दीर्घकालीन प्रवास आहे. या प्रवासात म्युच्युअल फंड आपल्या मदतीला येऊ शकतो. सेवानिवृत्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी योग्यवेळी सुरवात केल्याने गुंतवणूक वाढविण्यास आणि तणावमुक्त सेवानिवृत्तीचे आयुष्य जगण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

आर्थिक सल्लागार : ‘तुम्ही तुमची सेवानिवृत्तीची योजना आखली आहे का?’
काही सर्वसाधारण उत्तरे :
वय २५ : नुकतीच तर नोकरी लागली आहे, 
नंतर बघू.
वय २८ : आताच लग्न झाले आहे, नंतर करूया की!  
वय ३५ : मला आता घर आणि कारसाठी पैसे आवश्यक आहेत.
वय ५० : मला मुलांच्या लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी खर्च करावा लागणार आहे. 
वय ५५ : छे!, आता खूप उशीर झाला आहे. 
वय ६० : चिंतामय सेवानिवृत्ती!

Success Story:आईस्क्रीम, बिस्कीट आणि मिसेस बेक्टर!

एसबीआय रिटायर्डमेंट बेनिफिट फंड 
न्यू फंड आॅफर (एनएफओ) ः 
३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत
एसडब्ल्यूपी : अतिरिक्त सुविधा; 
ज्यात तिमाही आधारावर नियमित रक्कम 
सहज काढू शकता.
एसआयपी विमा : ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर मुदतीचे आयुर्विमा संरक्षण मिळवू शकता
आपोआप बदल : वयानुसार गुंतवणूक योजनांमध्ये आपोआप बदलाचा पर्याय.
माझा पर्याय ः तुमच्या निवडीवर आधारित गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय.

‘सकाळ मनी’च्या आर्थिक नियोजकांच्या अपॉइंटमेंटसाठी व या संधीचा लाभ घेण्यासाठी ७३५०८७३५०८ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com