Best Share : गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, तुमच्याकडे आहे का हा शेअर ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Tips

Best Share : गुंतवणूकदार झाले कोट्याधीश, तुमच्याकडे आहे का हा शेअर ?

Best Share : सीपीव्हीसी पाईप आणि फिटिंग्ज मेकर ऍस्ट्रलचे (Astral) शेअर्स मंगळवारी काही अंशी वाढीसह बंद झाले. लाँग टर्ममध्ये या शेअर्सने त्याच्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. येत्या काळात ऍस्ट्रलच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याचा विश्वास बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 2295 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 15% जास्त आहे. मंगळवारी बीएसईवर एस्ट्रलचे शेअर्स 1993.90 रुपयांवर बंद झाले.

हेही वाचा: Stock Market : 1 लाखाचे 96 लाख, 6 वर्षात 'या' शेअरची कमाल...

11 वर्षांत कोट्यधीश

13 जानेवारी 2012 रोजी ऍस्ट्रलच्या शेअर्सची किंमत 18.10 रुपये होती. आता त्याची किंमत 10916 टक्के वाढीसह 1993.90 रुपये झाली आहे, म्हणजेच त्या वेळी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 1.10 कोटी रुपये झाले आहे. अ‍ॅस्ट्रलने कमी कालावधीतही चांगला परतावा दिला आहे.

गेल्या वर्षी 20 जून 2022 रोजी ऍस्ट्रलच्या शेअर्सची किंमत 1584 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, अवघ्या अडीच महिन्यांत 68 टक्क्यांनी झेप घेऊन 9 सप्टेंबर 2022 पर्यंत हे शेअर्स 2654 रुपयांपर्यंत पोहोचले. पण, विक्रीच्या दबावामुळे ते आतापर्यंत 25 टक्क्यांनी घसरले आहे.

हेही वाचा: Stock Market In 2023 : नवीन वर्षात असा असेल शेअर बाजाराचा मूड; 'या' ६ गोष्टींचा होणार परिणाम

ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत जानेवारी-मार्च 2023 मध्ये पाईप्स विभागात तेजी दिसून येईल असा अंदाज देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने वर्तवला आहे.

याशिवाय, पीव्हीसीच्या किंमती आता जवळजवळ स्थिर आहेत, त्यामुळे चालू तिमाहीत मार्जिन सामान्य असू शकते. अ‍ॅस्ट्रलला यातून नफा मिळण्याची आशा आहे. याशिवाय अधेसिव्ह पदार्थांच्या किमतीही कमी झाल्यामुळे या व्यवसायातही मार्जिन सामान्य राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी पाहता, ब्रोकरेज फर्मने 2295 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटींग दिले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.