Stock Market In 2023 : नवीन वर्षात असा असेल शेअर बाजाराचा मूड; 'या' ६ गोष्टींचा होणार परिणाम

2023 मध्ये देशाच्या शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात.
Stock Market In 2023
Stock Market In 2023 Sakal

Stock Market in 2023 : अनियंत्रित चलनवाढ, वाढणारे व्याजदर, आंतरराष्ट्रीय युद्ध आणि कोविड-19 साथीच्या आजारामुळे मंदीची भीती आणि अशा वातावरणात 2022 हे वर्ष संपले आहे. पण नवीन वर्ष शेअर बाजारासाठी कसे असेल? 2023 मध्ये देशाच्या शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? ते जाणून घेऊयात.

1. महागाई आणि चलनविषयक धोरण :

2022 हे वर्ष केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महागाई नियंत्रणाबाहेर जाण्याच्या चिंतेने भरले होते. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वारंवार वाढ करण्यासारखे निर्णय घेण्यात आले.

त्यामुळे काही प्रमाणात किंमती आटोक्यात आल्या, पण चलन पुरवठा कमी झाल्याने आणि महागलेली कर्जे यांचा परिणाम आर्थिक रिकव्हरीवरही झाला. त्यामुळे रोजगार आणि विकास दरासारख्या चिंताही निर्माण झाल्या आहेत.

येत्या वर्षभरात संपूर्ण जगाच्या बाजारपेठेचे लक्ष या सर्व गोष्टींवर असणार आहे. अशा परिस्थितीत 2023 मध्ये केवळ भारतातच नाही तर जगभरातील बाजारपेठांच्या हालचालींवर या सर्व गोष्टींचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

2. देशांतर्गत आर्थिक विकास दर :

जगातील इतर मोठ्या देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे दिसते. 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर होईल, असा बहुतेक तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येण्याचीअपेक्षा आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

3. अर्थसंकल्प 2023-24 :

1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणारा देशाचा पुढील अर्थसंकल्पही भारतीय शेअर बाजारावर मोठा प्रभाव टाकू शकतो. पुढील आर्थिक वर्षासाठी 2023-24 साठी हा अर्थसंकल्प 2024 मध्ये होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

त्यामुळे सरकार आर्थिक उपक्रम आणि त्याद्वारे रोजगाराला चालना देणाऱ्या धोरणांवर मोठा भर देण्याची दाट शक्यता आहे. एकूणच, नवीन अर्थसंकल्पात अल्प आणि मध्यम मुदतीत बाजारावर परिणाम करणारी धोरणे जाहीर होण्याच्या अनेक शक्यता आहेत.

जर सरकारने आयकर स्लॅबमध्ये सूट देणे किंवा मध्यमवर्गाला खूश करण्यासाठी 80C अंतर्गत गुंतवणूक सवलतीची मर्यादा वाढवणे यासारख्या काही महत्त्वाच्या घोषणा केल्या, तर त्यामुळे बाजारात मागणी वाढेल. साहजिकच त्याचा फायदा शेअर बाजारालाही मिळू शकतो.

निवडणुकीतील फायद्यासाठी घेतलेल्या अशा लोकप्रिय निर्णयांचा अर्थव्यवस्थेला फायदा होत नाही. कारण त्याचा परिणाम सरकारच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.

नवीन अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले निर्णय आणि धोरणे यांची दिशा काहीही असली तरी देशाच्या शेअर बाजारांवर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होणे साहजिकच आहे.

4. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक :

2023 मध्ये जगातील श्रीमंत आणि विकसनशील देशांदरम्यान फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPI) च्या गुंतवणुकीचा प्रवाह ज्या दिशेने जाईल त्याचा थेट परिणाम शेअर बाजारांवरही होईल. जगातील अनेक श्रीमंत देश 2023 मध्ये आर्थिक मंदीचे बळी ठरले, तर भारत FPI साठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Stock Market In 2023
Sah Polymers IPO : वर्षातला शेवटचा आयपीओ खुला, जाणून घ्या अधिक

5. कोविड 19 चा प्रभाव :

2022 च्या डिसेंबरमध्ये कोविड पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. नवीन वर्षात त्याचा परिणाम शेअर बाजारांवरही होऊ शकतो. विशेषत: चीनमध्ये, कोविड 19 विषाणूच्या नवीन व्हेरीयंट पसरल्यामुळे आर्थिक चिंता वाढली आहे.

आता पुन्हा चीनची अर्थव्यवस्था किती वेगाने रुळावर येते याकडे सर्वांचे लक्ष असेल. जागतिक पुरवठा साखळी आणि व्यापारात चीनचे स्थान खूप महत्वाचे आहे, ज्याचा भारतासह संपूर्ण जगावर परिणाम होतो. नवीन वर्षात सर्व शेअर बाजारांवरही या घटकाचा परिणाम होणार हे उघड आहे.

6. रशिया-युक्रेन युद्ध :

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. नवीन वर्षात दोन्ही देशांमधील संघर्ष किती तीव्र होईल हे पाहणे आवश्यक आहे.

कारण त्याचा परिणाम शेतीपासून उद्योगांपर्यंत आणि आर्थिक विकास दरापासून शेअर बाजारापर्यंत प्रत्येक गोष्टीवर होणार हे निश्चित आहे. नवीन वर्षात या महत्त्वाच्या भू-राजकीय मुद्द्यावर बाजाराचे लक्ष राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com