कन्हैय्या कुमारच्या ताफ्यावर हल्ला; कन्हैय्याला किरकोळ दुखापत

टीम ई-सकाळ
Saturday, 1 February 2020

कन्हैय्या त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत बिहारमध्ये सिवान येथून छपराला जात होता. या प्रवासात कोपा ठाण्याजवळ, काही अज्ञातांनी कन्हैय्याच्या गाडीवर दगडफेक केली.

छपरा (बिहार) : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार याच्या ताफ्यावर बिहारमध्ये हल्ला झाला आहे. या हल्ल्यात कन्हैय्या आणि त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बजरंग दलावर आरोप?
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, कन्हैय्या त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत बिहारमध्ये सिवान येथून छपराला जात होता. या प्रवासात कोपा ठाण्याजवळ, काही अज्ञातांनी कन्हैय्याच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीच्या काचा फुटल्या आणि आतमध्ये कन्हैय्यासह काही जणांना किरकोळ दुखापत झाली. यात कन्हैय्या सुरक्षित असून, गाडीचे मोठ्या प्रमाणानवर नुकसान झाले आहे. दरम्यान, बजरंग दलाकडून उकसवल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप कन्हैय्याच्या साथीदारांनी केलाय, अशी बातमी नवभारत टाईम्सने प्रसिद्ध केली आहे. कन्हैय्याने 30 जानेवारीपासून चंपानेरमधून जन-गण-मन यात्रा सुरू केली आहे. यात ठिक ठिकाणी जाऊन तो जाहीर सभा घेत आहे. आज, सायंकाळी शनिवारी तो छपरामध्ये एका जाहीर सभेला उपस्थित राहणार होता. परंतु, ताफ्यावर हल्ला झाल्यामुळं तो कार्यक्रम रद्द झाला आहे.

आणखी वाचा - इऩ्कम टॅक्स संदर्भात सरकारची काय आहे घोषणा?

आणखी वाचा - शाहीनबाग आंदोलनात गोळीबार तरुणाला अटक

काय घडले?

  • कन्हैय्या कुमारची बिहारमध्ये  जन-गण-मन यात्रा 
  • सिवान येथून छपरा मार्गावर जात असताना ताफ्यावर हल्ला
  • कन्हैय्या कुमारच्या गाडीवर दगडफेक
  • कन्हैय्या किरकोळ जखमी आणि सुरक्षित
  • कन्हैय्याच्या सहकाऱ्यांचा बजरंग दलावर आरोप

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on convoy cpi leader kanhaiya kumar bihar chapra