अॅक्सिस बँकेचे कर्ज महागले, EMI वाढल्याने कर्जदारांचे कंबरडे मोडणार | Bank Loan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Axis Bank

अॅक्सिस बँकेचे कर्ज महागले, EMI वाढल्याने कर्जदारांचे कंबरडे मोडणार

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेनेही (Axis Bank) कर्ज महाग करण्याची घोषणा केली, तसेच बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR ) 35 बेस पॉईंटने वाढवला आहे. नवीन दर 18 मे पासून लागू झाले आहेत. त्यामुळे बँकेकडून घेतलेली सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. (Axis Bank Hike Bank Loan Rate )

हेही वाचा: केतकी चितळेला दिलासा नाही, कोर्टाने निकाल ठेवला राखून

या महिन्याच्या 4 तारखेला रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo Rate) 40 बेसिस पॉईंट्स आणि कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये (CRR ) 50 बेसिस पॉईंटने वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर जवळपास सर्वच लहान-मोठ्या बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. बड्या बँकांपैकी अॅक्सिस बँक ही एकमेव बँक होती जिने आतापर्यंत याची घोषणा केली नव्हती. परंतु, आता दोन आठवड्यांनंतर बँकेने अधिसूचना जारी करून कर्ज महाग करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अॅक्सिस बँकेतून कर्ज घेतले आहे. त्यांना अधिकचे व्याज द्यावे लागणार आहे.

हेही वाचा: छप्परफाड ऑफर! 20 वर्षांसाठी 0 टक्के व्याजदराने बँक देतेय होम लोन

व्याजदरात 35 टकक्यांनी वाढ

MCLR मध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ म्हणजे ऑटो, होम, बँकेकडील वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर 0.35% ने वाढले आहे. या वाढीनंतर नवीन ग्राहकांना केवळ कर्ज महाग होणार नाही, तर विद्यमान ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.

या वाढीनंतर एक रात्रं ते 1 महिन्यापर्यंतचा MCLR 7.55 टक्के झाला आहे. पूर्वी तो 7.2 टक्के होता. तर 3 महिन्यांचा MCLR 7.3 टक्क्यांवरून 7.65 टक्के झाला आहे. 6 महिन्यांचा MCLR आता 7.7 टक्के आहे आणि 1 वर्षाचा MCLR नव्या वाढीनंतर 7.75 टक्के झाला आहे. 2 वर्षांचा MCLR 7.5 टक्क्यांवरून 7.85 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR 7.55 टक्क्यांवरून 7.9 टक्के झाला आहे. (Bank All Loan Rate)

हेही वाचा: प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता प्रेयसी करायची चेन स्नॅचिंग

MCLR म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेने 2016 पासून कर्ज देण्याचे नियम बदलले आहेत. आता व्यावसायिक बँका मूळ दराऐवजी निधीवर आधारित कर्ज दर मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर (MCLR) कर्ज देतात. निधीची सीमांत किंमत MCLR निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. रेपो दरात बदल झाल्यावर या फंडात बदल होतो.

Web Title: Axis Bank Hikes Mclr Rates Home Loan Car Loan Emi Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top