Bajaj Share Price : बजाज हिंदुस्थान शुगरचा शेअर्स 20% वाढीसह अप्पर सर्किटमध्ये, तुमच्याकडे आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajaj Share Price

Bajaj Share Price : बजाज हिंदुस्थान शुगरचा शेअर्स 20% वाढीसह अप्पर सर्किटमध्ये, तुमच्याकडे आहे का?

बजाज हिंदुस्थान शुगरच्या ( Bajaj Hindusthan Sugar) शेअर्सने शुक्रवारी बीएसईवर 20% च्या वाढीसह अप्पर सर्किट गाठले. शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 20 टक्क्यांनी वाढून 13.52 रुपयांवर बंद झाला होता.

कंपनीने सर्व कर्ज फेडल्याच्या बातमीनंतर या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली आहे. बजाज हिंदुस्थान शुगरने शुक्रवारी स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. सर्व कर्जदारांना मुदत-कर्जाचे हप्ते (सप्टेंबर 2022 पर्यंत), मुदत-कर्जाचे व्याज (नोव्हेंबर 2022 पर्यंत) आणि ऑप्शनली कन्व्हर्टेबल डिबेंचर (OCD) कूपन (FY 2022 साठी देय) पूर्ण देय दिल्याचे कंपनीने शुक्रवारी सांगितले. (bajaj hindustan sugar share price increased by 20 percent in upper circuit share market )

बजाज हिंदुस्थान शुगरची यंदाची कामगिरी निराशाजनक आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून हा शेअर सुमारे 11 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत तो सुमारे 4.59 टक्क्यांनी घसरला आहे. पण, कर्जाची चिंता कमी केल्यानंतर, स्टॉकने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.

हेही वाचा: Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

कंपनी काय करते ?
बजाज हिंदुस्थान शुगर ही कंपनी साखर, अल्कोहोल, इथेनॉल आणि वीज निर्मितीच्या व्यवसायात आहे. कंपनीचे चौदा साखर कारखाने आहेत आणि देशातील आघाडीच्या साखर आणि इथेनॉल उत्पादकांपैकी एक आहे.

तिची एकूण ऊस गाळप क्षमता 1,36,000 TCD आहे. कंपनीकडे सहा डिस्टिलरीज आहेत ज्यात दररोज 800 किलोलिटर औद्योगिक अल्कोहोल तयार करण्याची क्षमता आहे. याशिवाय, त्यात 449 मेगावॅटची एकूण वीज निर्मिती क्षमता असलेले 14 को-जेनरेशन प्लांट आहेत.

हेही वाचा: New Bajaj Pulsar : नव्या पल्सरची बाजारात एंट्री; आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स, किंमतही आवाक्यात

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.