10 हजार रुपये भरून सरकारमध्ये भागीदार व्हा : नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

10 हजार रुपये भरून सरकारमध्ये भागीदार व्हा : नितीन गडकरी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (NHAI) उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या कंपनीचे अपरिवर्तनीय कर्जरोखे (Non Convertible Debentures) शुक्रवारी BSE मध्ये सूचीबद्ध झाले. उद्घाटनावेळी गडकरी म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि आम्हाला आशा आहे की आता किरकोळ खरेदीदार 10 हजार रुपये भरून राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. कोणताही सामान्य माणूस 10,000 रुपये भरून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (NHAI) अपरिवर्तनीय कर्जरोख्यांमध्ये (Non Convertible Debentures) सहभागी होऊ शकतो. यामध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणुकीवर 8% टक्के परतावा मिळू शकतो.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) या प्रयत्नात सेवानिवृत्त लोक, पगारदार वर्ग, छोटे आणि मध्यम व्यापारी 10 हजार रुपये भरून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सामील होऊ शकतात. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीवर मिळणारा परतावा खूप चांगला आहे. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक सामान्य माणसाने सहकार्य करावे. असं आवाहन गडकरी यांनी केलं.

हेही वाचा: Meta Shares : झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धक्का! गुंतवणुकदार चिंतेत

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI InvIT) मध्ये गुंतवणूक केल्यास 8.05 टक्के परतावा मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या लोकप्रियतेमुळेच InvIT ची दुसरी फेरी सुरु झाल्यानंतर अवघ्या 7 तासांत 7 वेळा ओव्हरसबस्क्राइब झाली. BSE वर InvIT NCDs ची नोंदणी करणे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. असे मानले जात आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आपल्या पहिल्या खाजगी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) द्वारे 5,000 ते 6,000 कोटी रुपये उभारण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. या गुंतवणूकदारांमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB) आणि ओंटारियो म्युनिसिपल एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टम (OMERS) यांचा समावेश आहे.

हेही वाचा: BYJU'S कंपनी अडचणीत? ‘ही’ आहेत कारणे

InvITs म्हणजे काय?

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) हे म्युच्युअल फंडांसारखे असतात, ज्याद्वारे पायाभूत सुविधांमध्ये वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणुकदाराने गुंतवणुक केल्यास परताव्याच्या रूपात उत्पन्नाचा एक छोटासा भाग मिळू शकतो. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट सारखे कार्य करतात.