esakal | येत्या काळात मिळवा बक्कळ पैसे, दमदार शेअर्सची यादी आणि टार्गेट्स
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

येत्या काळात मिळवा बक्कळ पैसे, दमदार शेअर्सची यादी आणि टार्गेट्स

sakal_logo
By
सुमित बागुल

बेस्ट मिडकॅप शेअर्सच्या (Best MidCap Stocks to Invest) लिस्ट मध्ये Bosch, Fine Organic Industries, Bayer Crop Science, SPARC, Titagarh Wagons आणि Radico Khaitan यांचा समावेश आहे. जर मिडकॅप स्टॉक्सच्या शोधात आहात तर या शेअर्सचा विचार नक्की करा. या सगळ्याच शेअर्समध्ये पुढे आणखी वाढ अपेक्षित आहे. काही मार्केट तज्ज्ञांनी हमखास रिटर्न्स देणारे शेअर्स कोणते त्याबद्दल माहिती दिली आहे.

अंबरीश बलिगा यांनी निवडलेले शेअर्स

लॉन्ग टर्म: Bosch

अंबरीश बलिगांनी लॉन्ग टर्ममध्ये Bosch चे शेअर्स निवडले आहेत. यात त्यांनी 20825 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ही कंपनी स्मार्ट प्लग आणि इलेक्ट्रिक पॉवर टूल्स बनवते तसेच फ्यूचरिस्ट बिझनेसमध्येही एक्सपर्ट आहे. कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये चांगली वाढ आहे, पण हा स्टॉक म्हणावी तशी भरारी नाही घेऊ शकला. ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वेहिकल्सवर फोकस असण्याचा फायदा कंपनीला येत्या काळात मिळेल.

हेही वाचा: अभिमान पुण्याचा! संकटकाळात व्हेंटिलेटर निर्मितीसाठी पुढाकार घेणारी नोकार्क स्टार्टअप

पोझिशनल पिकमध्ये त्यांनी Fine Organic Industries ची निवड केली आहे. यात त्यांनी 3600 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. फूड आणि पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये या कंपनीच्या प्रोडक्ट्सचा वापर होतो. ही कंपनी 450 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स बनवते आणि 5000 पेक्षा जास्त कंपन्या यांचे प्रोडक्ट्स खरेदी करतात.

शॉर्ट टर्म: Bayer CropScience

शॉर्ट टर्मसाठी त्यांनी Bayer CropScience ला निवडले आहे. कंपनी क्रॉप प्रोटेक्शनमध्ये आहे. मान्सून चांगला राहिला तर त्याचा कंपनीला नक्की फायदा होईल. यात त्यांनी 6200 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर

जय ठक्कर यांनी निवडलेले शेअर्स

लॉन्ग टर्म: Titagarh Wagons

जय ठक्कर यांनी दीर्घ काळासाठी Titagarh Wagons ची निवड केली आहे. यात त्यांनी 140 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. 52 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

पोझिशनल पिक: SPARC

जय ठक्कर यांनी पोझिशनल पिकमध्ये SPARC ची निवड केली आहे. यात त्यांनी 350 रुपयांचे लक्ष्य देत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 240 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद

शॉर्ट टर्म: Radico Khaitan

जय ठक्कर यांनी शॉर्ट टर्मसाठी Radico Khaitan ला झुकते माप दिले आहे. यासाठी त्यांनी 900 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. तर 710 रुपयांवर स्टॉप लॉसचा सल्ला दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image