esakal | पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol-Diesel

सोमवारी डिझेलच्या दरात किरकोळ कपात झाली होती तर पेट्रोलचे दर वाढले होते. जुलै महिन्यात 8 वेळा तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती दर दोन दिवसांनी वाढत आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा तेलाच्या दरात वाढ झाली. याआधी सोमवारी डिझेलच्या दरात किरकोळ कपात झाली होती तर पेट्रोलचे दर वाढले होते. जुलै महिन्यात 8 वेळा तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत.

दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या दरात 15 पैसे वाढ झाली. मुंबईत पेट्रोल 24 पैसे तर डिझेल 16 पैसे महाग झालं आहे. दिल्लीतील पेट्रोलचा प्रति लिटर दर 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल 107.54 रुपये तर डिझेल 97.45 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 109.89 रुपयांवर तर डिझेल 98.67 रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा: झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद

कोलकात्यात पेट्रोलचा दर 101.74 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 93.02 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नई, तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोलची किंमत 103 रुपयांवर पोहोचली आहे तर डिझेल 95 रुपयांवर आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत 105.52 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 97.96 रुपये प्रति लिटर आहे.

भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 89 टक्के तेल हे आयात केलं जातं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर कमी जास्त झाल्यास त्याचा भारतातील इंधन दरावर परिणाम दिसतो. तसंच पेट्रोल डिझेलवर प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असल्याने दर वेगवेगळे असतात.

loading image