भारत बाँड ईटीएफ पब्लिक सेक्‍टरमध्ये गुंतवणूक करणार

भारत बाँड ईटीएफ पब्लिक सेक्‍टरमध्ये गुंतवणूक करणार

मुंबई : एडलवाईज ॲसेट मॅनेजमेंट कंपनीतील भारत बाँड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडने (ईटीएफ) गुरुवारी (ता. १२) बाजारपेठेतील सखोलता आणि रिटेल सहभागाला चालना कशी द्यावी या विषयावर पत्रकार परिषद घेतली.

या परिषेदेत ईटीएफच्या माध्यमातून एडलवाईज म्युच्युअल फंडाने तीन वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत २००० कोटींच्या ग्रीन शू पर्यायासह ३००० कोटींची प्राथमिक रक्कम आणि १० वर्षांच्या मॅच्युरिटी काळात ६००० कोटींच्या ग्रीन शू पर्यायासह ४००० कोटी उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

तसेच या ईटीएफमध्ये टार्गेट मॅच्युरिटी स्ट्रक्‍चर्स असणार आहेत. यामध्ये तीन वर्षांच्या मॅच्युरिटीचे ईटीएफ निफ्टी भारत बाँड इंडेक्‍स- एप्रिल २०२३ प्रमाणे चालतील; तर १० वर्षांचा मॅच्युरिटी काळ असणारे ईटीएफ निफ्टी भारत बाँड इंडेक्‍स- एप्रिल २०३० प्रमाणे चालतील. निफ्टी भारत बाँड इंडेक्‍स- एप्रिल २०२३ चे ५ डिसेंबर २०१९ रोजीचे स्वरूप ६.६९ टक्के आहे; तर निफ्टी भारत बाँड इंडेक्‍स- एप्रिल २०३० हे प्रमाण ७.५८ टक्के आहे. तीन वर्षांहून अधिक काळ हे ईटीएफ ज्यांच्याकडे आहेत अशा गुंतवणूकदारांना इंडेक्‍सेशनसह भांडवली नफ्याचा फायदे मिळणे शक्‍य होणार आहे. 


भारतातील पहिल्या कॉर्पोरेट बाँड ईटीएफचे व्यवस्थापन करण्याची परवानगी सरकारने आम्हाला देणे हा आमचा सन्मान आहे. हे उत्पादन सादर करण्यात सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे कॉर्पोरेट बाँड बाजारपेठेला कमी दरातील, करसक्षम डेट उत्पादन मिळू शकेल.
- नितीन जैन, 
सीईओ, एडलवाईज ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर

web title : Bharat Bond  ETF will invest in public sector

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com