Gold Price - आठवड्याभरात सोने - चांदीच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या भाव

टीम ई सकाळ
Saturday, 2 January 2021

गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास 28 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. 

नवी दिल्ली - गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचा दर 49 हजार 572 रुपये इतका होता.  आठवड्याभरात यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून आज सोने प्रति दहा ग्रॅम 49 हजार 678 रुपये इथकं आहे. तर चांदीची किंमत 66 हजार 834 रुपये प्रति किलो इतकी होती. 686 रुपयांनी वाढून 67 हजार 520 रुपये इतकी झाली आहे. सोने चांदीच्या दरात झालेली ही वाढ किरकोळ आहे. 

2020 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्याआधी 2019 मध्येही सोन्याला झळाळी मिळाली होती. नव्या वर्षातही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोनं 50 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतकं आहे. 2021 मध्ये यामध्ये आणखी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात असून याआधीचा विक्रमी उच्चांकही मोडला जाऊ शकतो. तज्ज्ञांनी सोनं 63 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतकं महाग होऊ शकतं असं म्हटलं आहे. 

हे वाचा - केंद्र सरकारला जीएसटीने दिला हात; संकलनात मोठी वाढ

गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास 28 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. फक्त भारतातच नाही तर जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत 23 टक्क्यांनी वाढ झाली होती. याआधी 2019 मध्येही सोन्याचे दर दहा टक्क्यांहून अधिक वाढले होते. 

हे वाचा - गॅस बुकिंगसाठी द्या फक्त मिसकॉल; इंडियन ऑइलची नवी सुविधा

सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण कोरोना व्हायरस असल्याचं म्हटलं जात आहे. गुंतवणूकीसाठी सुरक्षित म्हणून सोन्याला पसंती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक कमी केली आहे. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये सोन्याचा दर हळूहळू वाढला पण त्यानंतर सोन्याच्या दरात वेगानं वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये उच्चांक गाठल्यानंतर सप्टेंबरपासून दर कमी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold price today silver rates saturday new year