शेअर मार्केट : मंदीची सुरवात झाली?

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८,७५६ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,५३२ अंशांवर बंद झाला. ६०,४१२ अंशांचा उच्चांक नोंदविल्यावर गेल्या आठवड्यात उच्चांकापासून ‘सेन्सेक्स’ने १६५६ अंशांची घसरण दर्शविली.
Share Market
Share MarketSakal
Updated on

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८,७५६ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,५३२ अंशांवर बंद झाला. ६०,४१२ अंशांचा उच्चांक नोंदविल्यावर गेल्या आठवड्यात उच्चांकापासून ‘सेन्सेक्स’ने १६५६ अंशांची घसरण दर्शविली. ‘निफ्टी’ने देखील गेल्या आठवड्यात उच्चांकापासून आठवड्याच्या बंद भावापर्यंत विचार केल्यास ४१५ अंशांची घसरण नोंदविली आहे. झालेली ही घसरण ‘करेक्शन’ म्हणजे तेजीच्या चक्रातील तात्पुरती विश्रांती आहे, का आता तेजीची लाट संपून मंदीची सुरवात झाली आहे? तेजीचा कथित फुगा फुटला आणि मंदी आली, तर ट्रेडर्सनी; तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी काय करायचे, हा प्रश्न पडताना दिसत आहे.

सध्या तरी बाजार अल्पावधीच्या आलेखानुसार ‘करेक्शन’ किंवा तेजीनंतरची रस्सीखेच करीत आहे. मात्र, आगामी काळात ‘करेक्शन’ वाढून मोठी घसरण झाल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संधीच मिळेल. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Share Market
गुंतवणुकीसाठी अत्यंत दमदार स्कीम, 20 वर्षात 42 पट परतावा...

सध्या ट्रेडर्सनी काय करावे?

शॉर्ट टर्म; तसेच मीडियम टर्मसाठी ट्रेडिंग करताना सर्वप्रथम बाजाराची दिशा पाहणे महत्त्वाचे असते. आलेखानुसार जर निर्देशांक; तसेच अनेक कंपन्यांचे शेअरदेखील तेजीची वाटचाल करीत असतील, तर मर्यादित जोखीम स्वीकारून तेजीचा व्यवहार करणे योग्य ठरते. जर निर्देशांक मंदी दर्शवत असेल आणि अनेक कंपन्यांचे शेअरदेखील आलेखानुसार मंदीची चाल दाखवत असतील तर अशा वेळेस ‘ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड’ म्हणत जोपर्यंत आलेखानुसार पुन्हा तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत तेजीचे नवे व्यवहार करू नयेत. बाजारात मंदी असेल तर यापूर्वी तेजी असताना ट्रेडिंगसाठी खरेदी केलेल्या शेअरना आलेखानुसार ‘स्टॉपलॉस’ ठेवून थांबणे आवश्यक असते.

प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यात रोज काहीतरी केलेच पाहिजे, हा पवित्रा घेण्यापेक्षा योग्य वेळेस व्यवहार करणे हिताचे ठरते. ‘मार्केट में रोज आयेंगे तो रोते हुए जायेंगे, मगर कम आयेंगे तो कमाते हुए जायेंगे’ या उक्तीनुसार सध्या तरी साप्ताहिक वाटचालीनुसार बाजाराचा कल नकारात्मक असल्याने पुन्हा तेजीचे संकेत मिळपर्यंत शॉर्ट टर्म; तसेच मीडियम टर्म ट्रेडिंगसाठी ‘वेट अँड वॉच’!

Share Market
झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये 1 महिन्यात 159 टक्क्यांची वाढ...

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी...

‘क्रॅश इज अ गिफ्ट’, असे म्हणतात. बाजारातील घसरण किंवा मंदी ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मिळत असलेली संधी असते. दीर्घकालीन गुंतवणूक करताना उत्तम धंदा करणाऱ्या कंपन्यांची निवड करणे आणि त्या गुंतवणुकीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. कारण वॉरेन बफे म्हणतात, ‘टाईम इज फ्रेंड ऑफ वंडरफुल बिझनेसेस.’ दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावर बाजार खूप वर गेला असेल तर ‘अरे वा!’ म्हणत गरज असल्यास आवश्यकतेनुसार नफा घेऊन दोन्ही हातांनी टाळ्या वाजवणे व बाजारात घसरण झाल्यास पुन्हा ‘अरे वा!’ म्हणत योग्य संधी ओळखून खरेदी करीत दोन्ही हातांनी संधीचा फायदा घेणे योग्य ठरते. सध्या बाजारात ‘करेक्शन’ किंवा घसरण चालू असताना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एशियन पेंट्स, कॅम्स, एसबीआय कार्डस आदी कंपन्यांच्या शेअरचा टप्प्याटप्प्याने खरेदीसाठी जरूर विचार करावा.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com