Share Market : गुंतवणूकदार मालामाल! केवळ 37 हजारात बनले कोट्यधीश; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

सध्या शेअर्स 58.25 रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्याचे मार्केट कॅप 742.26 कोटी रुपये आहे.
Share Market
Share Marketesakal

Share Market : इंफ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील टेक्समॅकोच्या (Texmaco) शेअर्सची स्थिती सध्या काहीशी चांगली नाही. गेल्या पाच दिवसांत तो दोन टक्क्यांहून अधिक कमकुवत झाला आहे. पण असं असलं तरी लाँग टर्ममध्ये त्याच्या शेअर्सनी चांगला परतावा दिला आहे.

केवळ 37,000 रुपयांच्या गुंतवणुकीने त्याने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. सध्या, त्याच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे, पण नुकताच बाजाराच्या कमकुवत सेंटीमेंटमध्येही ग्रीन झोनमध्ये बंद झाला.

सध्या टेक्समॅकोचे शेअर्स 58.25 रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्याची मार्केट कॅप 742.26 कोटी रुपये आहे.

टेक्समॅकोचे शेअर्स 27 सप्टेंबर 2002 रोजी फक्त 21 पैशांना मिळत होते. आता ते 27,638 टक्क्यांनी वाढून 58.25 रुपयांवर आलेत. म्हणजेच 21 वर्षांपेक्षा कमी कालावधीत तो 277 पटीने वाढला आहे.

37,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर त्याने गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी 2022 रोजी त्याची किंमत 50 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांक आहे.

अवघ्या दोन महिन्यांत तो 64 टक्क्यांनी वाढत 82.25 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. पण आता तो 29 टक्क्यांनी कमी किंमतीवर मिळत आहे.

केके बिर्ला समूहाचा एक भाग म्हणून 1939 मध्ये टेक्समॅकोची सुरुवात झाली. 2010 मध्ये, त्याचा मुख्य व्यवसाय हेवी इंजिनिअरिंग आणि स्टील फाउंड्री व्यवसाय वेगळे करून टेक्समॅको रेल अँड इंजिनियरिंग लिमिटेड नावाच्या एका वेगळ्या कंपनीत विभागला गेला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

तर टेक्समॅको इन्फ्रास्ट्रक्चर अँड होल्डींग लिमिटेडला Adventz Group च्या बॅनरखाली आणण्यात आले. हे रिअल इस्टेट, मिनी हायडल पॉवर आणि गुंतवणूक या व्यवसायात आहे.

ते पश्चिम बंगालमध्ये एक मिनी हायडल चालवते. लवकरच ते दिल्ली आणि कोलकात्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Share Market
स्फुटनिक अदानींवर की बाजारावर ?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com