Panacea Biotec : बाजाराच्या घसरणीतही बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या 'या' शेअरमध्ये वाढ

युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनकडून (PAHO) ऑर्डर मिळाल्याची घोषणा केल्याचे कंपनीने जाहीर केले.
Panacea Biotec
Panacea Biotec sakal

मंगळवारी बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनकडून (PAHO) ऑर्डर मिळाल्याची घोषणा केल्याचे कंपनीने जाहीर केले. अशातच पॅनासिया बायोटेकच्या (Panacea Biotech) शेअर्सने बेंचमार्क निफ्टी इंडेक्सला मागे टाकत 18 टक्क्यांनी वाढून 158 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत. तर निफ्टी सध्या 0.2 टक्क्यांनी घसरत आहे.

Panacea Biotec
Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 843 तर निफ्टी 257 अंकावर स्थिरावला

पॅनासिया बायोटेकला 12.73 कोटी डॉलर अर्थात 1,040 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. एकूण ऑर्डरपैकी युनिसेफची ऑर्डर 813 कोटी रुपयांची आहे तर बाकी ऑर्डर्स पीएएचओकडून मिळाले आहे.

पॅनासिया बायोटेकला 2023-2027 दरम्यान WHO प्री-क्वालिफाईड पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये युनिसेफला प्री-क्वालिफाईड फुल्ली लिक्विड पेंटाव्हॅलेंट लसीचे  (pre-qualified fully liquid Pentavalent vaccine) सुमारे 10 कोटी डोस पुरवणार आहे. तर 2023-2025 पीएएचओला सुमारे 2.5 कोटी डोस पुरवणार आहे.

Panacea Biotec
Stock: एक रुपयापेक्षा कमी किंमतीच्या 'या' शेअरने गुंतवणूकार कोट्याधीश...

इझी फाईव्ह एन (Easyfive-n) ही पूर्णपणे द्रव स्वरूपातील जगातील पहिली डब्ल्यू पी आधारित पेंटाव्हॅलेंट लस (wP-based Pentavalent vaccine) आहे. ही लस भारतात पहिल्यांदा 2005 मध्ये लाँच करण्यात आली होती. 2008 मध्ये डब्ल्यूएचओ (WHO) प्रीक्वालिफिकेशन प्राप्त झाल्यापासून, या लसीचे 15 कोटीहून अधिक डोस जागतिक स्तरावर 75 पेक्षा जास्त देशांना पुरवले गेले आहेत.

पॅनासिया बायोटेक कंपनी ही लस, मधुमेह, ट्रांसप्लांट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि ऑन्कोलॉजीसाठी औषधे तयार करते. त्यांनी 2017 मध्ये जगातील पहिली पूर्णपणे द्रवरूप हेक्साव्हॅलेंट लस इझीसिक्स (Hexavalent vaccine EasySix) लाँच केली. कंपनी डेंग्यू लस (dengue vaccine) आणि न्युमोकोकल कंजुगेट लसही (Pneumococcal Conjugate vaccine) विकसित करत आहे.

Panacea Biotec
Share Market: शेअर बाजारात मोठी उसळण; Sensex 1,564 वर तर Nifty 446

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com