Bonus Share : पैसाच पैसा! 'या' कंपन्या देणार गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bonus Share

Bonus Share : पैसाच पैसा! 'या' कंपन्या देणार गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे गिफ्ट

Bonus Share : चीनमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे आरोग्य मंत्री बैठक घेणार असल्याची बातमी येताच शेअर बाजाराने यू-टर्न घेतला आणि गेले चार दिवस, बाजारात मोठी घसरण दिसून आली.

शुक्रवारी सेन्सेक्स 900 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. मात्र या घसरणीदरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन कंपन्या बोनस शेअरचे वितरण करणार आहेत. बोनस शेअर्ससाठी कंपन्यांनी निश्चित केलेली रेकॉर्ड डेट या आठवड्यात आहे. जाणून घेऊया कोणती कंपनी किती बोनस शेअर देणार.

हेही वाचा: Indian Economy : RBI चे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांचे सूचक वक्तव्य; पुढील 20 वर्षात भारत...

1. नायसा सिक्युरिटीज बोनस शेअर रेकॉर्ड डेट (Naysaa Securities Bonus share Record Date)

कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी 10 शेअरधारक गुंतवणूकदारांना बोनस म्हणून 15 शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत न्यासा सिक्युरिटीजचे 10 शेअर्स धारण करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराला कंपनीकडून 15 बोनस शेअर्स मिळतील. या वर्षी Nysa सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना 600 टक्के परतावा दिला आहे.

बोनस रेकॉर्ड तारीख - 31 डिसेंबर 2022

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

2. अद्वैत इन्फ्राटेक बोनस शेअर रेकॉर्ड तारीख (Advait Infratech Bonus share Record Date)

Advt Infratech या स्मॉल कॅप कंपनी बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीने पात्र गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक 1 शेअरमागे 1 शेअर बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मॉल कॅप कंपनीने यावर्षी परताव्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. Advate Infratech च्या शेअर्सच्या किंमती 2022 मध्ये 400 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख - 28 डिसेंबर 2022