esakal | Budget 2020 : 'टीबी हारेगा, देश जीतेगा'; आरोग्य क्षेत्रासाठी 'या' तरतूदी

बोलून बातमी शोधा

budget 2020 key highlights for health and wellness in marathi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी नेमकी काय तरतूद आहे वाचा...

Budget 2020 : 'टीबी हारेगा, देश जीतेगा'; आरोग्य क्षेत्रासाठी 'या' तरतूदी
sakal_logo
By
वृत्तसंस्था

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी नेमकी काय तरतूद आहे वाचा...

आरोग्य क्षेत्र : सरकार आरोग्य क्षेत्राचा सर्वसमावेशक विचार करत धोरण आखणार. मिशन इंद्रधनुष या योजनेचा विस्तार करत नवे रोग आणि नव्या लसी यावर काम करणार. फीट इंडियावर काम करणार. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 20,000 इस्पितळांचा समावेश. टिअर 2 आणि 3 शहरांमधील गरिबांना योजनेचा लाभ. पीपीपी तत्वावर चालणाऱ्या हॉस्पिपटलसाठी भांडवली तरतूद करणार. 112 गरजवंत जिल्ह्यांना आधी प्राधान्य देणार.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टीबी हरेगा, देश जीतेगा कॅम्पेनद्वारे 2025 पर्यत देशातून टीबीचे निर्मलून करणार. एकूण 69,000 कोटी रुपयांची आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद. यात पंतप्रधान आरोग्य योजनेसाठी 6,400 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार.

जल जीवन मिशन योजनेसाठी 3.6 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर. यातून जलसंधारण, जलसाठे वाढवणे, भूजल पातळीचा स्तर उंचावणे, पाण्याचे संवर्धन आणि जुने साठ्यांचा पुनरुज्जीवन करणार.

निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे 

शिक्षण क्षेत्रासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी). एनईपीची घोषणा सरकार लवकरच करणार. चांगल्या शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी शिक्षण क्षेत्राला भांडवली पुरवठा करण्याची आवश्यकता ईसीबी आणि एफडीआयची मदत शिक्षण क्षेत्रासाठी घेतली जाणार. एकूण 150 शिक्षण संस्थांमध्ये मार्च 2021 पर्यत अॅप्रेन्टीसशीप कार्यक्रम राबवणार. शहरी भागातून अभियंत्यांसाठी पदवी घेतल्यावर एक वर्षाच्या आत नोकरी उपलब्ध करून दिली जाण्याचा प्रयत्न करणार. परदेशात शिक्षक, नर्स, वैद्यकीय स्टाफची मोठी गरज. मात्र त्यासाठी आवश्यक दर्जा गाठण्याची आवश्यकता, अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन.