Budget 2023 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 'या' पक्षांचा बहिष्कार; राहुल गांधी करणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2023

Budget 2023 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 'या' पक्षांचा बहिष्कार; राहुल गांधी करणार...

Budget 2023 : आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल, परंतु बीआरएस (BRS) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासह अनेक विरोधी पक्ष भाषणावर बहिष्कार टाकू शकतात.

रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. यादरम्यान गौतम अदानी आणि बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या मुद्द्यावरून विरोधक गोंधळ घालू शकतात.

सोमवारी अर्थसंकल्पापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये विरोधकांनी अदानी, बीबीसी, जात-आधारित गणना आणि सभागृहात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकारनेही सर्व पक्षांना सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले आहे.

त्याचवेळी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याची मागणी केंद्राने विरोधकांकडे केली. याशिवाय विरोधी पक्ष बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा सभागृहात उपस्थित करू शकतात.

काँग्रेस आणि टीएमसीने राखले अंतर :

ज्या मुद्द्यांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती त्यापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने अंतर ठेवले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा काल समारोप झाला, त्यामुळे त्या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिले नाहीत. द्रमुक, आम आदमी पार्टी, आरजेडी, सीपीएम आणि सीपीआयने या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही मुरलीधरन हे देखील उपस्थित होते. या बैठकीत 27 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते, असे जोशी यांनी सांगितले.

अलीकडेच हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविषयी एक अहवाल आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये उघडपणे सहभागी आहे.

मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटा असून बदनामीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या अहवालावरून देशभरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी, बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या माहितीपटावरून देशात खळबळ उडाली आहे.