अंबानी आता 'श्रीमंत' नाहीत!

वृत्तसंस्था
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

भारतातील दूरसंचार बाजारपेठेत घडत असलेल्या मोठमोठ्या आणि अनर्थपूर्ण घडामोडींमुळे रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे 'श्रीमंत' किंवा 'धनाढ्य' नाहीत.

मुंबई : भारतातील दूरसंचार बाजारपेठेत घडत असलेल्या मोठमोठ्या आणि अनर्थपूर्ण घडामोडींमुळे रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे 'श्रीमंत' किंवा 'धनाढ्य' नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी ब्रिटनमधील न्यायालयात सांगितले. याआधी अनिल अंबानी धनाढ्यांच्या यादीत गणले जायचे. 

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य कशी?

अनिल अंबानी यांनी परदेशातील बँकांमधून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. हेच ६८० दशलक्ष डॉलरचे कर्ज वसूल करण्यासाठी चीनमधील मोठमोठ्या बँकांनी  न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत झालेल्या सुनावणीत बोलताना अंबानी यांच्या वकिलांनी हे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे ते लवकर हे कर्ज फेडू शकत नाहीत, आता ते धनाढ्या नाहीत असेही या सुनावणीत स्पष्ट करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2012 मध्ये अनिल अंबानी यांनी ९२५ दशलक्ष डॉलर कर्जाला वैयक्तिक हमी दिली होती. याबद्दल माहिती देण्याची मागणी  दी इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि., मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेण्ट बँक आणि एग्झिम बँक ऑफ चायना यांनी केली आहे. पण अंबानी यांनी यावर धक्कादायक उत्तर देत, आपण अशी कोणतीही हमी दिली नसल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman Anil Ambani Is No Longer Rich says at Britain court